आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक अब्ज स्मार्टफोनची विक्री होण्याची शक्यता : आयडीसी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- जागतिक संशोधन संस्था (आयडीसी- इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन) च्या मते यंदा जगभरात स्मार्टफोनची विक्री वाढून हा आकडा एक अब्जावर जाण्याची शक्यता आहे.

स्वस्त अँड्रॉइड फोनच्या वाढत्या मागणीमुळे कंपन्या विविध नवीन मॉडेल लाँच करत आहेत, असे आयडीसीचे म्हणणे आहे. या वर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये जगभरात 21 कोटी 62 लाख स्मार्टफोनची विक्री झाली, तर एप्रिल जूनमध्ये हा आकडा 23 कोटी 79 लाखांवर गेला. त्यानुसार 2013 च्या तिसर्‍या तिमाहीमध्ये विक्रीचा हा आकडा वाढून 25 कोटी 84 लाख झाला. ही वाढ 38.8 टक्के आाहे. कोणत्याही तिमाहीसाठी ही विक्रमी वाढ आहे. त्यामुळे यंदा विक्रमी एक अब्ज स्मार्टफोनची विक्री होऊ शकते, असे आयडीसीचे म्हणणे आहे.