आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता टी-शर्टच सांगेल तुमची प्रकृती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्सची रहिवासी साइंसने एक खास टी-शर्ट तयार केले आहे. या टी-शर्टमध्ये खास सेन्सर लावण्यात आले आहे. हे टी-शर्ट ज्याने घातले त्याच्या प्रकृतीविषयी माहिती सांगणार आहे. विशेष म्हणजे हे टी-शर्ट तुम्हाला धुताही येईल आणि प्रेसही करता येईल. कंपनीने अद्याप या टी-शर्टची किंमत जाहिर केलेली नाही. हे टी-शर्ट याच वर्षी बाजारात उपलब्ध होईल.

मायक्रो सेन्सर
यातील सेन्सर तुमच्या शरीराचे तापमान, श्वासाची गती, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि हदयाचे ठोके मॉनिटर करतात.

रिम्युव्हेबल ट्रान्समीटर

हा डाटा स्टोअर करून टी-शर्टपासून वेगळा करता येईल आणि ब्लूटूथने कनेक्ट करता येईल.

अ‍ॅप
रिअल टाइममध्ये हेल्थसंबंधी सर्व माहिती मोबाइलवर मिळेल.

डाटाबेस
हा डाटा कंपनीच्या डाटाबेसमध्ये जमा होईल आणि लॉग इन करून तुम्हाला पाहाता येईल.

अ‍ॅनालीसीस सेंटर
एका ठराविक आठव्यात किंवा महिन्यात तुमची प्रकृती कशी आहे हे देखील टी-शर्ट सांगेल.


ही माहिती मिळेल

* शारीरिक थकव्याचा स्तर किती आहे याची माहिती मिळेल.
* याचबरोबर तणावाचा स्तर आणि त्याचा परिणाम याचीही माहिती मिळेल.
* या टी-शर्टमध्ये हदयविकाराचा झटका आणि धोका याचीही माहिती मिळेल.