आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smart World : Intex Launched Itself In Smartphone Market

स्मार्ट जगात: स्मार्टफोनच्या मांदियाळीत ‘इंटेक्स’ची भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मोबाइल क्षेत्रातील दादा कंपन्यांना आता स्थानिक मोबाइल कंपन्यांकडूनदेखील आव्हान मिळू लागले आहे. स्मार्टफोनच्या विस्तारलेल्या बाजारपेठेत पंख पसरण्यासाठी इंटेक्स या कंपनीने नवा ‘इंटेक्स अ‍ॅक्वा आय सेव्हन’ हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बॉलीवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तरच्या हस्ते या नवीन मोबाइलचे अनावरण करण्यात आले.


स्मार्टफोनसाठी बाजारातील मागणी लक्षात घेऊन यंदाच्या आर्थिक वर्षात 1,800 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे लक्ष्य इंटेक्सने डोळ्यासमोर ठेवले आहे. इतकेच नाही, तर यंदाच्या वर्षासाठी कंपनीने विपणानासाठी 100 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले आहे. यावरूनच मोबाइल बाजारपेठेतील स्थान भक्कम करण्याचा कंपनीचा ठाम इरादा दिसून येतो.


इंटेक्स टेक्नॉलॉजीजचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संजय कॅलिरोना म्हणाले की ‘आय सेव्हन’पाठोपाठ पुढच्या दोन महिन्यांत अशा प्रकारचे आठ आणखी स्मार्टफोन बाजारात आणण्यात येणार आहेत. तिमाही ते तिमाही आधारावर विक्रीमध्ये 400 टक्के वाढ नोंदवण्याचा इरादाही त्यांनी या वेळी व्यक्त केला. इंटेक्सचे सध्या बाजारात 35 स्मार्टफोन, 12 स्मार्टफोन आणि नीत टॅब्लेट आहेत. पुढील दोन महिन्यांत चार हजार ते वीस हजार रुपयांच्या श्रेणीतील आठ आणखी स्मार्टफोन आणण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.


असा आहे ‘इंटेक्स अ‍ॅक्वा आय सेव्हन’
* मातृभाषा बहुभाषिक अ‍ॅप्लिकेशनमुळे मराठीसह 22 स्थानिक भाषांमध्ये संवाद साधणे शक्य
* मायस्क्रीन अ‍ॅपच्या मदतीने वापरकर्त्याला एकाच वेळी चार फंक्शन पार पाडता येतात
* वापरकर्त्याचे फोनकडे लक्ष नसते त्या वेळी ‘लूक अवे’ फीचर फोनला पॉझ करते
* इंटेक्स क्लाउडमुळे 5 जीबीची अतिरिक्त स्टोअरेज सुविधा
* अँड्रॉइड 4.2 जेलिबिन ऑपरेटिंग प्रणाली, 1.2 गीगाहर्ट्झ क्वाड कोअर प्रोसेसर, 13 एमपी रिअर कॅमे-यामुळे पूर्ण एचडी व्हिडिओ आणि 5 एमपी फ्रंट कॅमे-यामुळे व्हिडिओज घेता येतात.


या रंगात उपलब्ध
काळा आणि पांढरा
21,900 रु किंमत


उपलब्ध केव्हापासून
9 सप्टेंबरपासून