आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही सेकंदांत सेल्फीची प्रिंट देणारी स्मार्टफोन केस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- एका फ्रेंच कंपनीने तयार केलेल्या स्मार्टफोन केसमधून काही सेकंदांत सेल्फीची प्रिंट काढता येणार आहे. या केसमध्ये बिल्ट इन प्रिंटर देण्यात आले आहे. ब्ल्यूटूथद्वारे ही केस स्मार्टफोनशी जोडली असून ऑर्डर दिल्यानंतर ५० सेकंदांत आपल्याला फोटोची प्रिंट मिळते.

प्रिंटचा अवधी ३० सेकंदांवर
>फोटो प्रिंट करण्यासाठीचा वेळ लवकरच ५० सेकंदांवरून ३० सेकंदांवर आणणार, असा कंपनीचा दावा
> सध्या या केसमध्ये एकच पेपरशीट बसते. मात्र, लवकरच त्यात ३० पेपरशीट बसतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे, असे आश्वासन प्रिंट कंपनीचे सीईओ क्लेमेट पेरॉट यांनी दिले आहे.
> २०१५ या वर्षाच्या सुरुवातीला ही स्मार्टफोन केस अधिक सुविधांसह बाजारात उतरण्याची शक्यता
> सध्या चार इंची स्मार्टफोनसाठी ही केस तयार करण्यात आली असून भविष्यात मोठ्या फोनसाठीही काही मॉडेल्स तयार करण्याचा कंपनीचा विचार आहे.
> या स्मार्टफोन केसची किंमत ९९ डॉलर्स म्हणजेच सुमारे सहा हजार रुपयांपर्यंत असेल.
> प्रिंट अॅपच्या मदतीने युजर फोटो काढत असताना एकच फोटो रेकॉर्ड न करता या अॅपद्वारे फोटोपूर्वीच्या आणि नंतरच्या क्षणांचा व्हिडिओही रेकॉर्ड केला जाईल.