आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SAMSUNG GALAXY NOTE 3: काय म्‍हणतात दिग्‍गज टेक साईट्स, वाचा रिव्‍ह्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅमसंगने लोकप्रिय ठरलेल्‍या गॅलेक्‍सी मालिकेतील नवा स्‍मार्टफोन 'नोट-3' लॉंच केला आहे. सॅमसंगचा हा अतिशय महत्त्वाकांक्षी फोन आहे. यापूर्वीचे नोट आणि नोट-2 स्‍मार्टफोन्‍स गॅजेटप्रेमींमध्‍ये‍ हिट ठरले होते. त्‍यामुळे या फोनकडून ब-याच अपेक्षा आहेत. निश्चितच हा फोन अपेक्षा पूर्ण करणारा आहे. या फोनमध्‍ये अनेक नवे फिचर्स आहेत. इतर फोन्समध्‍ये असे फिचर्स दिसणार नाही. या फोनला गॅजेट रिव्‍ह्यू करणा-या वेबसाईट्सनेदेखील पसंती दिली आहे. तांत्रिकदृष्ट्या हा फोन सरस असल्‍याचे या साईट्सने म्‍हटले आहे.

गॅजेटविश्‍वातील दिग्‍गज या फोनला गॅलेक्‍सी नोट-2चेच मेकओव्‍हर मानत आहेत. हा फोन भारतात 25 सप्‍टेंबरला लॉंच करण्‍यात येणार आहे. नोट-2 ला भारतात जबरदस्‍त प्रतिसाद मिळाला होता. त्‍यामुळे या फोनचीही भारतात उत्‍सुकता दिसून येत आहे.

Cnet- प्रसिद्ध तंत्रज्ञान साईट Cnetने या फोनचा रिव्‍ह्यू प्रसिद्ध केला आहे. या साईटने फोनच्‍या मल्‍टी टास्‍क‍ींग फिचरवर जोर दिला आहे. फोनच्‍या लुक्‍सवरही भर दिला आहे. हा फोन अतिशय आकर्षक दिसत असल्‍याचे Cnet ने म्‍हटले आहे.

Mashable- या साईटने 'ऍक्‍शन मेमो' नावाचे एक स्‍मार्ट फिचरवर भर दिला आहे. हे फिचर अतिशय चांगले असल्‍याचे मॅशेबलने म्‍हटले आहे. फोनच्‍या लुक्‍सचेही या साईटने कौतूक केले आहे.

SMH- सिडनी मॉर्निंग हेरॉल्‍डनेही या फोनची स्‍तुति केली आहे. या फोनला हताळताना नोट-2 सारखाच अनुभव मिळतो, असे म्‍हटले आहे.

ITWire- या साईटने 3 शब्‍दांमध्‍ये फोनचे विश्‍लेषण केले आहे. फास्‍टर, चीपर आणि बेटर, असे हे तीन शब्‍द आहेत. फोनचे लुक्‍स आणि परफॉर्मन्‍सबाबत या साईटनेही स्‍तुति केली आहे.

Guardian- गार्डियनने नोट-3 फोन चांगला असल्‍याचे म्‍हटले आहे. परंतु, त्‍यात गरजेपेक्षा जास्‍त फिचर्स दिल्‍यामुळे फोनचा वापर क्लिष्‍ट झाल्‍याचेही म्‍हटले आहे. फोनमध्‍ये खूप फिचर्स आहेत.


गॅलेक्‍सी नोट-3 स्‍मार्टफोनचे इतर फिचर्स आणि स्‍पेसिफिकेशन्‍स जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...