आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्टफोनचे मार्केट दुप्पट !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - भारतात मोबाइल ही वस्तू आतापर्यंत संपर्काचे साधन म्हणून वापरली जात होती. आता अनेक सेवा व मनोरंजनाचे साधन म्हणून तो विस्ताराच्या दुस-या टप्प्यात पोहोचला आहे. भारतात सध्याही केवळ पाच टक्के ग्राहकांकडे म्हणजे सरासरी 4-5 कोटी ग्राहकांकडेच स्मार्टफोन आहे. जपानमध्ये हे प्रमाण 65 ते 59 टक्के इतके आहे. सध्याचा कल लक्षात घेता या वर्षी स्मार्टफोनधारकांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. भारतीय बाजारपेठेत भविष्यात 4 ते 5 हजार रुपये किमतीच्या स्मार्टफोनची मागणी आणि विक्री वाढेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

भारती एअरटेलचे इंडिया व साऊथ एशिया विभागाचे सीईओ संजय कपूर यांनी सांगितले की, यावर्षी भारतीय टेलिकॉम बाजारात अनेक बदल पाहवयास मिळतील. यात स्मार्टफोनची विक्रीत येणारी उसळी प्रमुख असेल. 80 डॉलरपर्यंत किंमत असलेल्या (4 ते 5 हजार रुपये) किमतीच्या स्मार्टफोनची विक्री वाढू शकेल. सेवा पुरवठादार कंपनी म्हणून भारती एअरटेल डाटा प्रसारासाठी उपयुक्त ठरतील, असे स्मार्ट डिव्हाइस सादर करण्यास उत्सुक आहे. स्मार्टफोनची विक्री आणि प्रसार वाढल्याने 3 जी कनेक्टिव्हिटीही वाढेल. स्मार्ट फोनची विक्री वाढवण्यात तरुणाईचा हातभार मोठा असेल, असे कपूर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल इंटरनेटधारक वाढले
कपूर यांनी सांगितले की, नव्या शुल्करचनेमुळे टेलिकॉम कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे, परंतु डाटा सर्व्हिसेस वाढल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. या वर्षी मूल्यवर्धित सर्व्हिसेसचे योगदान 12 - 12 टक्क्यांवरून वाढून 20 टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. जपान व कोरियात ही आकडेवारी 50 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. भारत 2013 मध्ये तो 20 टक्क्यांपर्यंत वाढू शकेल. देशाच्या ग्रामीण भागातही मनोरंजनासाठी इंटरनेटचा वापर वाढू लागला आहे. 2009 मध्ये मोबाइलवरील इंटरनेटधारकांची संख्या 41 लाख होती. त्यात वाढ होऊन 2012 मध्ये ती 8 कोटी 71 लाखांपर्यंत पोहोचली आहे. प्रादेशिक भाषांतही नेटची मागणी, ग्राहक वाढत आहेत.

थ्री जी डेटाचा खप वाढला
देशात गेल्या सहा महिन्यांत 2 जी व 3 जी मोबाइल डाटामध्ये 50 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. साधारण मोबाइल डाटा खपाच्या तुलनेत ही वाढ दुप्पट आहे. नेटवर्क कव्हरेज, स्वस्त दर व मोबाइल कंटेंट व अ‍ॅप्लिकेशनवरून डाटा खप वाढत आहे. जगभरात थ्री जीचा जम बसण्यास 3 ते चार वर्षे लागली. भारतात 2011 ला त्याची सुरुवात झाली व सध्या थ्री जी डाटा ट्रॅफिक 70 टक्यांपर्यंत वाढली आहे.

मोबाइल ट्रांझेक्शन वाढले
पुढील 2 - 3 वर्षांत भारतात 50 - 100 दशलक्ष व्यक्ती मोबाइलवर आर्थिक व्यवहार करताना आढळून येतील. आजघडीला 240 दशलक्ष लोकांची बँक खाती असून 12 दशलदक्ष लोकांकडे क्रेडिट कार्ड आहेत. 90 टक्के व्यवहार हे रोख देवघेवीद्वारे होतात, परंतु पैसे पाठवणे, बिल भरणे, टेलिकॉम रिचार्ज, तिकीट बुकिंग आदी व्यवहार मोबाइलवरून सुरू झाले असून त्यात पुढील पाच वर्षांत लक्षणीय वाढ दिसून येईल, असे संजय कपूर यांनी स्पष्ट केले.