आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smartphone Market News In Marathi, Divya Marathi, Business

स्मार्टफोनसाठी एप्रिल महिना हिट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्मार्टफोनसाठी चालू आर्थिक वर्षाचा पहिला महिना सुपरहिट ठरला आहे. या एप्रिल महिन्यात विविध कंपन्यांनी आतापर्यंत 25 पेक्षा जास्त स्मार्टफोन लाँच केले असून, त्यांची किंमत 5 हजारांपासून ते 35 हजार अशी आहे.

एप्रिल महिन्यात देशी तसेच विदेशी दोन्ही कंपन्यांनी आपापली नवीन उत्पादने लाँच केली आहेत. सॅमसंग, मायक्रोमॅक्स, सोनीसह अनेक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांनी आपले नवीन गॅझेट्स बाजारात आणले आहेत. मायक्रोसॉफ्टने नवीन विंडोज 8.1 फोन सॉफ्टवेअर लाँच केले. सॅमसंग गॅलेक्झीसारख्या स्मार्टफोनपासून मायक्रोमॅक्स कॅन्व्हाससारखे कमी बजेट असलेले फोन लाँच केले आहेत. यात 25 हजार 400 रुपयांचा एस - 3 नियो, 51 हजार 500 रुपयांचा सॅमसंग गॅलेक्झी एस- 5 यांचा समावेश आहे.