आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smartphone Market News In Marathi, Indian Market, Divya Marathi, Micromax

एप्रिलमध्ये भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोन तेजीची ट्रिंगट्रिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्मार्टफोनच्या बाबतीत चालू आर्थिक वर्षाचा पहिला महिना एप्रिल सुपरहिट ठरला आहे. या महिन्यात आतापर्यंत विविध कंपन्यांनी 25 हून जास्त स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. या हँडसेटची किंमत 5000 ते 35,000 रुपयांदरम्यान आहे. एप्रिलमध्ये सॅमसंग, मायक्रोमॅक्स, सोनीसह देश-विदेशातील अनेक कंपन्यांनी आपापले स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.
एकीकडे मायक्रोमॅक्सने विंडोज 8.1 सॉफ्टवेअरवर आधारित नवा फोन सादर केला, तर दुसरीकडे जिओनी आणि हुओवेईसारख्या चिनी कंपन्यांनी आपले महत्त्वाकांक्षी स्मार्टफोन बाजारात सादर केले. भारतीय बाजारपेठेचा विचार केल्यास सॅमसंग गॅलक्सीसारख्या महागड्या स्मार्टफोनपासून ते मायक्रोमॅक्स कॅन्व्हाससारखे कमी बजेटचे स्मार्टफोनही बाजारात आले. एप्रिलमध्ये जे स्मार्टफोन सादर करण्यात आले, त्यात 25,400 रुपये किमतीचा सॅमसंग गॅलक्सी एस-3 निओ, 51,500 रुपये किमतीचा सॅमसंग गॅलक्सी एस-5, मायक्रोमॅक्सचा कॅन्व्हास डुडल-3, लेनोव्हो एस-660 आणि 13,999 रुपयांचा जिओनी पायोनिअर जी-4 यांचा समावेश आहे.

इतर हँडसेटमध्ये असुसने दोन स्मार्टफोन सादर केले, ज्यांची किंमत 9000 रुपयांहून जास्त आहे, तर झेडटीई ग्रँड एस-2, लावा आयरिस प्रोचे तीन हँडसेट बाजारात आले असून त्यांची किंमत 13,999 रुपयांपर्यंत आहे. स्पाइस स्लेटर गाइडने दोन हँडसेट सादर केले असून त्यांची किंमत 5,199 रुपये आणि 7,999 रुपये आहे. मॅक्सने एएक्स 411 ड्युओ सादर केला असून त्याची किंमत 5199 रुपये आहे. तर स्मार्ट नमो ओक्टा हा हँडसेट केवळ 3999 रुपयांत उपलब्ध आहे. ईसीने 14,500 रुपये किमतीचा दुसरा हँडसेट दाखल केला. एकंदरीतच मोबाइल हँडसेटच्या बाबतीत एप्रिल महिना जगासह भारतासाठीही नवनव्या उत्पादनांचा राहिला. एक्स्पीरिया एम-2 हा हँडसेटही याच काळात आला असून त्याची किंमत 21,990 रुपये आहे.

एप्रिलमध्ये दाखल स्मार्टफोनच्या किमती
25,400 रु. सॅमसंग गॅलक्सी एस-3 निओ
51,500 रु. सॅमसंग गॅलक्सी एस-5
13,999 रु. जिओनी पायोनिअर जी-4
9000 रु. हून जास्त असुस
13,999 रु. पर्यंत लावा आयरिस प्रो
7999 रु. स्पाइस स्लेटर ग्लाइड