आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी iPad चे चाहते तर ओबामा वापरतात BlackBerry, वाचा, अन्य लीडर्सची आवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅझेट डेस्क- भाजप नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे देशाचे 15 व्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींनी गेल्या गुरुवारी (22 मे) अहमदाबादहून दिल्लीत दाखल झाले. मोदींनी आपल्यासोबत आणलेल्या साहित्यात त्यांचा आयपॅड आणि लॅपटॉपचा समावेश आहे. मोदी नियमित आयपॅडवर बातम्या वाचतात. नरेंद्र मोदी फोन स्वत:जवळ ठेवत नाहीत. परंतु आयपॅड नेहमी त्यांच्यासोबतच असतो.

अमेरिकेतील एक संस्था जगातील सर्व राजकीय नेत्यांच्या फोन, आयपॅडबाबत संपूर्ण माहिती ठेवत असते. 'अॅडवर्ड स्नोडेन'प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर प्रत्येक देशातील राजकीय नेते फोन हॅकिंग आणि प्रत्येक हेरगिरीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील कथित संस्था जवळपास जगातील 35 राजकीय नेत्यांवर बारीक लक्ष ठेवून आहे.
या संस्थेने कम्युनिकेशन डिव्हाइसेस अपग्रेड केल्यानंतर लागलीच देश-विदेशातील लीडर्स आपले फोन बदलतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे Blackberry फोन वापरतात.

कोण आहे अॅडवर्ड स्नोडेन?
अॅडवर्ड स्नोडेन एक अमेरिकन कॉम्प्यूटर प्रोफेशनल आहे. स्नोडेन हा अमेरिकन सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सी आणि नॅशनल सिक्युरिटी एजन्सीचा माजी कर्मचारी आहे. स्नोडेनचे नाव एका रात्रीतून रात्रीतून चर्चेत आले होते. स्नोडेन याने गुप्तचर खात्यातील गोपनिय अहवाल मीडियात लीक केले होते. गुप्तचर खात्याचे हे गोपनिय अहवाल स्नोडेनला DELL तर्फे NSA कॉन्ट्रेक्टर म्हणून काम करताना मिळाले होते.