आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसएमई क्षेत्राला सोसवेना वाढत्या कर्जाचा भार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तीनशे कोटी रुपयांपेक्षा कमी महसूल असलेल्या नोंदणीकृत लहान व्यावसायिकांना बॅँकांकडून कर्जपुरवठा करण्यात आलेला असला तरी त्यापैकी अर्ध्याहून अधिक कर्ज तणावाखाली आहे. महसूल मिळकतीवर ताण आल्यामुळे नजीकच्या काळात लघु आणि मध्यम उद्योगांना (एसएमई) देण्यात आलेल्या कर्जामध्ये सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

नोंदणी झालेल्या लघु आणि मध्यम कंपन्यांना देण्यात आलेल्या एकूण बॅँक कर्जांपैकी जवळपास 46.3 टक्के कर्ज प्रचंड तणावाखाली आहे. चार कंपन्यांमागे एका कंपनीला व्याजाबरोबरच अन्य आव्हानांना तोंड द्यावे लागत असल्याचे ह्यइंडिया रेटिंग्जह्णने आपल्या अहवालात म्हटले आहे. एसएमई आर्थिक मंदीचा पहिला बळी ठरल्या असून आर्थिक वर्ष 2011 पासून या क्षेत्रातील महसूल वाढ घसरत एक अंकापर्यंत आली आहे. दुसर्‍या बाजूला हीच गोष्ट आर्थिक वर्ष 2013 पासून बड्या कंपन्यांबाबत घडली असल्याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

एसएमई क्षेत्रातील महसुलाची परिस्थिती पुढील 12 ते 18 महिने तरी सुधारण्याची शक्यता नाही. त्यातून या परिस्थितीत सुधारणा घडवून आणायची असेल तर बड्या कॉर्पोरेट्सच्या कामकाज भांडवल दिवसांमध्ये कपात करणे गरजेचे असल्याचे अहवालात म्हटले आहे.

मोठ्या कंपन्यांच्या कामकाज भांडवल दिवसांत 50 टक्क्यांपर्यंत कपात होत नाही तोपर्यंत एसएमर्इंची स्थिती सुधारणार नाही. त्यातूनही 2010-11 आणि 2011-12 या वर्षांमधील आर्थिक उंचीची पातळी गाठणेही गरजेचे आहे. परंतु पुढील 12 ते 18 महिन्यांत ते अशक्य असल्याचे अहवालात म्हटले आहे.

नकारात्मक दर्जाची एसएमई क्षेत्रे : रसायन, वस्त्र, ऊर्जा, पोलाद, बांधकाम ; स्थावर मालमत्ता - स्थिर