आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोभा डेव्हलपर कंपनीच्या सुपर लक्झरी प्रकल्पाची पुण्यात घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - भांडवली बाजारावर नोंद असलेल्या आणि २० अब्ज रुपये उलाढाल असलेल्या सोभा डेव्हलपर कंपनीने पुण्याच्या दक्षिण भागातील कोंढवा येथे आरामदायी (सुपर लक्झरी) सदनिकांच्या गार्नेट ( थ्री ) या नव्या प्रकल्पाची आज येथे घोषणा केली.

पुण्याची बाजारपेठ सध्याच्या स्थितीत स्थिर असली तरी वेगाने होत असलेल्या शहरीकरणामुळे सोभाच्या सदनिकांना चांगली मागणी आहे असे रिजनल हेड सुरजीत चंदा यांनी पत्रकारांना सांगितले. गार्नेट ( थ्री ) या नव्या प्रकल्पाची माहिती देताना चंदा म्हणाले की साडेसात एकर जागेत हा प्रकल्प असून २२०० ते ४४०० चौरस फुटाच्या ५१ सदनिका बांधल्या जात आहेत. थ्री बीएचके च्या ४४, चार बीएचकेच्या ड्युप्लेक्स पाच आणि खासगी बाग असलेली चार बीएचकेची दोन पेंटहाउस अशा ५१ सदनिका असतील.

हा प्रकल्प २०१५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रती चौरस फुट सात हजार रुपये दर असून . थ्री बीएचके दोन कोटी रुपये, ड्युप्लेक्स चार कोटी रुपये तर पेंट हाउस साडेचार कोटी रुपये अशा किमती आहेत.

येत्या वर्ष भरात कर्जावरील व्याज दर काही प्रमाणात कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त करून चंदा म्हणाले की बंगलोर पाठोपाठ पुण्याची रिअल इस्टेट बाजारपेठ वाढते आहे. रिअल इस्टेट क्षेत्रासाठी नियामक यंत्रणा आल्याने संतुलित विकास होइल. जकात जाउन स्थानिक संस्था कर आल्याचा आमच्या सारख्या मोठ्या कंपन्यांना फायदाच होणार आहे.