आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Enterprises In India Received $1.6 Bn In 14 Years: Report News In Divya Marathi

सामाजिक कंपन्यांकडे मोठ्या गुंतवणूकदारांचा वाढता कल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या म्हणजेच सोशल एंटरप्राइझ कंपन्यांतही गुंतवणूकदारांनी विकासाच्या चांगल्या संधी शोधल्या आहेत. इंटेलीकॅप या आघाडीच्या सामाजिक सल्लागार संस्थेने या संदर्भात एक अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार मागील 14 वर्षांत सामाजिक कंपन्यांत एकूण 160 कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे. भारतात सामाजिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित असणार्‍या 220 कंपन्यांत ही गुंतवणूक करण्यात आली आहे.

सामाजिक बदलांसाठी प्रयत्न करण्यासाठी झालेल्या गुंतवणुकीचा अशा प्रकारे प्रथमच अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालानुसार 2000 पासून ते आतापर्यंत म्हणजेच 21 व्या शतकाच्या सुरुवातीच्या 14 वर्षांत ज्या 220 कंपन्यांत करण्यात आलेली 160 कोटी डॉलरची गुंतवणूक नामवंत गुंतवणूकदारांकडून करण्यात आली आहे. निव्वळ सामाजिक क्षेत्राला प्राधान्य देणार्‍या आविष्कार, ओमिड्यार नेटवर्क आदी प्रमुख गुंतवणूकदारांचा यात समावेश आहे या गुंतवणूकदारांनी 43.5 कोटी डॉलरची गुंतवणूक या क्षेत्रात केली आहे. मुख्य प्रवाहातील व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकदार आणि खासगी इक्विटी फंडांनी सामाजिक क्षेत्रात प्रभाव टाकणार्‍या कंपन्यांत मागील 14 वर्षांत 90.6 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. उर्वरित गुंतवणूक मात्र इतर गुंतवणूकदारांकडून करण्यात आली आहे. इंटेलीकॅपच्या मते, या 14 वर्षांत एंजल, फॅमिली ऑफिस, व्हेंचर कॅपिटल, खासगी फंड कंपन्या, देशातील तसेच विदेशी गुंतवणूकदार संस्था व इतर संस्था या सर्व गुंतवणूकदारांनी सामाजिक बदलासाठी झटणार्‍या कंपन्यांत गुंतवणूक करण्यात आली आहे.

क्षेत्रनिहाय गुंतवणुकीचा विचार केल्यास आरोग्य, कृषी आणि क्लीन एनर्जी क्षेत्रातील सामाजिक कंपन्यांत गुंतवणूकदारांनी 34.1 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. असे असले तरी सामाजिक बदलासाठी झटणार्‍या या कंपन्यांतील खास गुंतवणुकीचा परिणाम नेमका काय झाला हे मात्र स्पष्ट होऊ शकले नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

सामाजिक बदलासाठी
इंटेलीकॅपच्या मते, एंजल, फॅमिली ऑफिस, व्हेंचर कॅपिटल, खासगी फंड कंपन्या, देशातील तसेच विदेशी गुंतवणूकदार संस्था व इतर संस्था या सर्व गुंतवणूकदारांनी सामाजिक बदलासाठी झटणार्‍या कंपन्यांत गुंतवणूक करण्यात आली आहे.