आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंद्रा नुयींनी केला पेप्सीकोचा कायापालट; सॉफ्ट ड्रिंक कंपन्या घेणार लोकांच्या आरोग्याची काळजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिल सेपोरिटो
पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नुयी यांनी पेप्सीचे प्रॉडक्ट आणखी आकर्षक बनवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. वर्ष २०२५ पर्यंत त्यांनी पेप्सीच्या सॉफ्ट ड्रिंक्सची कॅलरी २० टक्के कमी करण्याचे वचन दिले आहे. तसे वॉलस्ट्रीट जर्नलने यावर शंका उपस्थित केली आहे.

महत्त्वपूर्ण निर्णय – नुयी यांनी ट्रॉपिकाना कंपनी खरेदी करून आणि क्वेकरच्या सोबत पेप्सीमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. त्यांनी पर्पज प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कंपनीला सामाजिक रूपात आणखी जबाबदार बनवण्याचा इरादा दाखवला आहे.

आव्हाने – अमेरिकेत सोडा आधारित पेयांच्या विक्रीत घट होताना दिसत आहे. त्यातून नेल्सन पेल्ट्ज कंपनीसारख्या गुंतवणूकदारांना कंपनीला पेय युनिट पेप्सी आणि स्नॅक फूड युनिट फ्रिटो ले - अशा दोन विभागांत कंपनी विभागण्याच्या मागणीची संधी मिळाली आहे. यादरम्यान वॉलस्ट्रीटने आरोग्यासाठी चांगली उत्पादने बनवण्याच्या नुयी यांच्या पुढाकारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

समर्थन – माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि त्यांची संस्था क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्ह अमेरिकेच्या मिडल आणि हायस्कूल्ससाठी कमी कॅलरीचे पेय पुरवण्यासाठी सोडा इंडस्ट्रीसोबत एकत्र काम करत आहेत.

टीकाकार – न्यूयॉर्क विद्यापीठात न्यूट्रिशनच्या प्राध्यापिका मेरियन नेसले यांनी कमी कॅलरी पेयासाठी नुयीच्या पुढाकाराला प्रचाराची चलाखी मानले आहे. सुश्री नेसले यांचे

म्हणणे आहे की, सॉफ्ट ड्रिंक विकणाऱ्या कंपन्या पेयांमध्ये कॅलरीचे प्रमाण घटवण्याचे समर्थक आहेत, तर त्यांना सॅन फ्रान्सिस्कोसारख्या देशांमध्ये सोडा टॅक्स लावण्याचा विरोध करायला नको.

पुढे काय? – अमेरिकेत अलीकडे पेप्सी ट्रू च्या ७.५ औंस कॅनमध्ये ६० कॅलरी आहे. त्यात सामान्य पेप्सीच्या तुलनेत ३० टक्के कमी कॅलरी आहे. पेप्सी ट्रू ग्राहकांना आवडेल का?
पुढील स्लाईडवर पाहा, इंद्रा नुयी यांचे पेप्सीकोमधील इतर फोटो...