आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्फोसिसच्या धक्क्याने बाजार गारद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिसने जानेवारी - मार्च तिमाही आणि पुढील आर्थिक वर्षातही वाढीबाबत व्यक्त केलेला नकारात्मक अंदाजाने बाजाराला धक्का दिला. त्यामुळे युरोप शेअर बाजारातील स्थिरता आणि भांडवली ओघ चांगला येत असतानाही बाजारात झालेल्या विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स 82 अंकांनी घसरून 21,774.61 अंकांच्या एका आठवड्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.

सकाळच्या सत्रात काहीसा खालच्या पातळीवर उघडलेल्या सेन्सेक्समध्ये नंतर सुधारणा झाली; परंतु युरोप शेअर बाजारातील तेजी आणि आशियाई शेअर बाजारातील संमिश्र वातावरणामुळे सेन्सेक्सला फारसा जोर मारता आला नाही. इन्फोसिसने आपल्या वाढीबाबत व्यक्त केल्याचा मोठा धक्का बाजाराला बसला. त्यामुळे इन्फोसिस बरोबरच अन्य माहिती तंत्रज्ञान समभागांची दिवसअखेर पडझड झाली. त्यामुळे सेन्सेक्स 81.61 अंकांनी घसरून 21,774.61 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टी 23.80 अंकांनी घसरून 6493.10 पातळीवर बंद झाला.

औद्योगिक उत्पादनात झालेली 0.1 टक्क्यांची वाढ आणि किरकोळ महागाईत झालेल्या घसरणीमुळे बाजाराने सकारात्मक सुरुवात केली होती. परंतु बाजार नियंत्रक सेबीने भांडवल बाजारातील मनी लॉँडरिंगला चाप लावण्यासाठी कडक नियम केल्यामुळे बाजारात सावध व्यवहार झाले.