आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉफ्टवेअर समभागांवरील फंडांची माया पातळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या सॉफ्टवेअर समभागांमधील व्यवहारांना म्युच्युअल फंडांनी आता विश्रांती दिली आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये म्युच्युअल फंडांची सॉफ्टवेअर समभागांमधील गुंतवणूक कमी होऊन ती जवळपास ३४ हजार कोटी रुपयांवर आली आहे.
बाजार नियंत्रक सेबीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ३१ डिसेंबरअखेर म्युच्युअल फंडांनी सॉफ्टवेअर समभागांमध्ये ३३,९७० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील ३.३ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या तुलनेत हे प्रमाण १०.२० टक्के आहे. त्या तुलनेत म्युच्युअल फंड उद्योगाने यंदाच्या नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक ३४,६७४ कोटी रुपयांची गुंतवणूक सॉफ्टवेअर समभागांमध्ये केली होती. बाजारात आलेल्या तेजीमुळे निधी व्यवस्थापकांनी मे महिन्यापासूनच माहिती तंत्रज्ञान समभागांच्या खरेदीचा सपाटा लावला होता.
सॉफ्टवेअर समभागांतील गुंतवणूक : मे २०१४- २२,९८६ कोटी , नोव्हेंबर : ३४,६७४ कोटी., डिसेंबर : ३३,९७० कोटी
अन्य गुंतवणुकीचा कल
बँक ७३,००० कोटी रु.
फार्मा, ऑटो २०,९५९ कोटी रु.
वित्त १९,८१९ कोटी रु.