आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सौर ऊर्जेवर चालणारा संगणक 'डीएसके'ने केला देशाला समर्पित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शिक्षण, शेती, दुग्ध व्यवसाय अशा अनेक क्षेत्रासह केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वसमावेशकतेला साह्यकारी ठरू शकेल असा सहज वाहून नेता येण्याजोगा संगणक (पोर्टेबल डिव्हाईस) डीएसके डिजिटल कंपनीने आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते देशाला समर्पित केला. हा डिव्हाईस सौर ऊर्जेवर चालू शकतो.

नगर आणि सातारा या दोन जिल्ह्यात त्याचा वापर याआधीच केला जात असून श्रीरामपूरच्या प्रशांत डेअरीचे किशोर निर्मळ यांनी त्याचा वापर दूध संकलन व्यवसायात सुरु केला आहे. सध्या पाच हजार छोटे व्यावसायिक त्याचा वापर यशस्वीरीत्या करत असून सेन्ट्रल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रने त्यासाठी अर्थसाह्य केले आहे.

गेल्या चार वर्षाच्या अथक परिश्रमानंतर पोर्टेबल डिव्हाईस आल्याची माहिती डी.एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सतीश गोखले, मिलिंद क्षीरसागर, विनय देशपांडे यांनी त्याची रचना, विकसन यात मोलाची कामगिरी बजावल्याचे नमूद करून ते म्हणाले की मुख्यतः बँकांना कमी खर्चात सरकारचा आर्थिक सर्वसमावेशकतेचा कार्यक्रम राबविण्यास या डिव्हाईसची मदत मिळेल आणि त्यातून उद्यमशीलता वाढेल तसेच ग्राहकाला पैसे मिळण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज उरणार नाही. या उपकरणाची किमत २२ हजार रुपये असून त्यासाठी २०१८ पर्यंत २०० कोटी रुपये गुंतविले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५०कोटींची गुंतवणूक केली आहे.

वाय-फाय, जीपीआरएस, स्मार्टकार्ड रीडर, कॅमेरा, पाच तास बॅकअप ही या डिव्हाईसची वैशिष्ट्ये आहेत, अशी माहिती देऊन मुख्याधिकारी विनोद फिलिप्स म्हणाले की येत्या तीन वर्षात किमत १२ हजार रुपयापर्यंत खाली आणण्याचा आमचा उदेश आहे. डिव्हाईस वापरून आतपर्यंत ५० हजार शेतकरी ग्राहकांची खाती सुरु करण्यात आहेत. नेट, व्हिडिओ, डाटा अशा सेवा देण्यास तरुणांना त्याचा व्यवसाय संधी म्हणून चांगला वापर करता येईल.