आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाय रुपयाचे अवमूल्यन रोखण्याचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच असून, प्रतिडॉलर 62 रुपयांवर ती गेली आहे. वर्षभरापासून ही घसरगुंडी सुरू असून, त्यात सध्या तरी लगाम लागेल असे दिसत नाही. प्रत्येक वेळेस सोन्यावरील आयातकर वाढवून रुपयाची घसरगुंडी थांबेल असे वाटत नाही. जागतिक अर्थव्यवस्था मंदीमध्ये असतानाही भारतीय रुपयाची तब्येत छान ठणठणीत होती. पण गेल्या वर्षापासून जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होऊन मंदी हटण्याचे चिन्ह दिसू लागताच भारतीय अर्थव्यवस्थेला घरघर सुरू झाली. प्रत्येक वेळेस सरकार, सरकारी धोरण व बँक धोरणेद्वारे फक्त कागदी कर कमी करून तूट भरून काढायचा प्रयत्न करत असतो. पण प्रत्यक्ष ती तूट कायमची भरून निघणे शक्य नाही. सोने व त्यावरील गुंतवणूक भारतीय अर्थव्यवस्थेला कशी घातक आहे. हे गेल्या दोन वर्षांपासून अर्थक्रांती चळवळीच्या सहका-यांनी व इतरांनी सरकारला कल्पना देऊन धोक्याची जाणीव करून दिली. अमेरिकन बाजाराचे सर्व जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहेत. जगाची अर्थव्यवस्था अमेरिकेभोवती फिरत आहे. याला एकच उपाय म्हणजे आपल्या देशातील नैसर्गिक साधनसामग्रीचा उपयोग करून आपली निर्यातक्षमता वाढवून आपल्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करणे, जेणेकरून इतर देशांसारखे आर्थिक डबघाईमुळे रुपयाच्या घसरणीवर जास्त परिणाम होणार नाही.


वरील विचार करता आपण निर्यातवाढीसाठी आमूलाग्र बदल करणे अत्यावश्यक आहे. माझ्या मताप्रमाणे खालील उद्योगास सरकारने प्राधान्य देऊन प्रोत्साहित करणे :
1. भारतीय खाद्यपदार्थास जगभर प्रसिद्धी मिळत असून परदेशातील भारतीय हॉटेलमध्ये व इतर ठिकाणी जास्तीत जास्त भारतीय अन्नधान्याची - फळांची - भाजी या सर्व बनलेल्या पदार्थाचा जास्तीत जास्त वापर करण्याची योजना परदेशामध्ये रुजली पाहिजे. उदा. जसे जागतिक स्तरावर भारतीय पदार्थाद्वारे बनलेल्या खाद्यपदार्थाचे प्रदर्शन, फूड फेस्टिव्हल आयोजित करणे व खाद्यपदार्थाला मागणी वाढल्यास अन्नधान्य, फळ, भाजी या सर्व गोष्टींची मागणी वाढवून निर्यात झाल्यास आपल्या देशातील धान्य उत्पादक शेतकरी व उत्पादित करणारे सर्व घटक यांच्यात आर्थिक सुधारणा झाल्यास भारताची अर्थव्यवस्था मजबूत होईल. भारतात नैसर्गिक देणगी म्हणजे ऊन, वारा, पाऊस याचा त्रिवेणी संगम असल्याने इतर देशांच्या तुलनेत येथे वरील सर्व गोष्टी उत्पन्न करण्यास मदत होते. भारतीय खाद्यपदार्थाची चव (टेस्ट) व त्याचे प्रकार जगामध्ये कोठेही नाहीत. पदार्थाची दर्जेदार चव व गुणवत्ता जागतिक बाजारपेठेमध्ये आणणे.
2. परदेशात आयुर्वेद औषधाचा प्रसार करून निर्यात वाढवावी. आयुर्वेदिक डॉक्टरांनी ग्रुप हॉस्पिटलची संकल्पना राबवल्यास त्याचा फायदा देशात व परदेशात आयुर्वेदाची महती वाढवण्यास मदत होईल. देशातील सर्व पर्यटनस्थळी व इतर महत्त्वाच्या ए दर्जाच्या शहरी व पंचतारांकित हॉटेल या ठिकाणी आयुर्वेदिक माहिती केंद्र स्थापन करणे, जेणेकरून बाहेरदेशातील पर्यटक आकर्षित होतील. त्यामुळे आयुर्वेदाचा प्रसार होऊ लागेल व औषधाची निर्यात होऊन भारतामध्ये आयुर्वेदिक मेडिकल टुरिझमची स्थापना करावी. जगभरात व पाश्चिमात्य देशांतही आयुर्वेदिक चिकित्सा घेण्याचा कल वाढत आहे. केवळ पंचकर्म व मसाज नव्हे तर विविध व्याधींवर उपचारासाठी आयुर्वेदिक औषधांचा वापर करीत आहे.
3. भारतीय हस्तकला व ग्रामोद्योग व्यवसायाद्वारे उत्पादित मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देऊन निर्यात वाढवणे.
4. भारतीय कपाशी (कापूस) पासून बनवलेले कपडे हे जगामध्ये सर्वोत्तम श्रेणी व गुणवत्तेचे असून प्रसिद्ध आहेत. त्यासाठी निर्यातीचे प्रमाण जास्तीत जास्त वाढवण्यासाठी भारतीय कॉटन हब स्थापन करणे प्रत्येक देशातील मुख्य शहरामध्ये व त्या देशातील उद्योगपतींशी अथवा कंपन्यांशी भागीदारी करून खप वाढवावा.
5. परदेशी वाहनांनी भारतीय बाजारपेठ पूर्णपणे काबीज केल्यामुळे वरील सुटे पार्ट (भाग) व वाहने आयात करण्यास आपले डॉलर चलन जास्त खर्च होते. स्वदेशी वाहन उत्पादन करणा-या कंपनीला सरकारी योजना, सूट व उत्पादनाला लागणा-या गोष्टी अल्पदरात व नियम शिथिल करून प्रोत्साहन देणे, जेणेकरून निर्यातदर वाढेल व आयात कमी होईल. वरील सर्व गोष्टी सरकार व जनतेची इच्छाशक्ती असल्यासच शक्य होतील. ऊन-सावलीच्या खेळाप्रमाणे तात्पुरते पॅकेज, योजना व घोषणा याचा उपयोग होणार नाही.
व्यापक कार्यक्रमांतर्गत येत्या दहा वर्षातील औद्योगिक व व्यापारी आयात निर्यात धोरण आपल्या देशातील विद्वान, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ व हुशार अभ्यासू लोकांकडून अहवाल सूचना व त्यावर उपाय व चर्चा करून लगेच दिशा ठरवावी. भारतीय सरकार व जनतेस आत्मसात होईल अशा व्यावसायिक, आर्थिक, शैक्षणिक सुधारणा करून व अर्थक्रांतीच्या सूचनांचे अवलंब
करून आपल्या रुपयाची घसरण थांबेल व भारत देश जागतिक बाजारपेठेत टिकून राहून निश्चितच विकसित राष्ट्र बनेल. सरकारी धोरणात्मक दृष्टीने
निर्णय व बदल होईल. नाहीतर डॉलर निश्चितच येत्या वर्षभरात आपल्या हिरव्यागार 100 रुपयाच्या नोटांच्या बरोबर येईल. मग आपला हिशोब सुरू होईल. (1 डॉलर - 100 रुपये)


desectrojunction@yahoo