आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाला तरतरी, सोने घसरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ नवी दिल्ली - पाच सत्रांपासून डॉलरपुढे लोळण घेणा-या रुपयात गुरुवारी तरतरी आली. रुपयाने डॉलरची यथेच्छ धुलाई करत ५० पैशाच्या कमाईसह ६३.११ ही पातळी गाठली. गेल्या सात महिन्यांतील एकाच सत्रातील ही रुपयाची सर्वोत्तम कामगिरी ठरली. तिकडे सराफा बाजारात सोन्याची घसरण सुरूच आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे ५० रुपयांनी घसरून २७,२५० वर आले. चांदी किलोमागे ३६,७०० रुपयांवर स्थिर राहिली.

सराफा व्यापा-यांनी सांगितले, देशात ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांच्याकडून मागणी कमी आल्याचा परिणाम सोन्यावर दिसला. अमेरिका फेडरल रिझर्व्हने व्याजदर जैसे थे ठेवण्याचे संकेत दिल्याने जागतिक सराफ्यात सोने चमकले, मात्र देशातील मागणीच्या अभावामुळे त्याचा फारसा लाभ दिसला नाही. सिंगापूर सराफ्यात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) १ टक्क्याने वाढून १२०२.०८ डॉलरवर पोहोचले. दिल्लीच्या सराफ्यात बुधवारी सोने तोळ्यामागे १०० रुपयांनी महागले होते. दिवाळीत तोळ्यामागे २८ हजारांची पातळी दाखवणा-या सोन्यावर दिवाळीनंतर असलेला दबाव अद्याप कायम आहे.