आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयकर पत्रकासंबंधी थोडेसे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयकर पत्रक निर्धारण वर्ष 2013-14 (आर्थिक वर्ष 2012-13) साठी भरण्याची मूळ अंतिम मुदत ही 31 जुलै 2013 होती, परंतु या वर्षी ई - फायलिंगला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि वेबसाइट ओव्हरलोड झाल्याने सी.बी.डी.टी.ने ऑनलाइन रिटर्न भरण्याची मुदत 5 ऑगस्ट 2013 केली, परंतु जर अद्यापही पत्रक भरणे बाकी असेल, तर आयकरदाता त्याचे आयकर पत्रक 31 मार्च 2014 पर्यंत दंडस्वरूपी व्याजासह भरू शकतात, परंतु आयकर पत्रक भरताना खालील काही बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

मूलभूत सूट मर्यादा : आयकरासाठी चालू निर्धारण वर्षात 2 लाख रुपये एवढी सूट आहे. म्हणजेच आपले उत्पन्न 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. त्यापेक्षा अधिक असेल तर पहिल्या 2 लाख रुपये उर्वरित रकमेवर कर लागेल.आयकरचा दर : 2,00,001 रुपयांपासून 5,00,000 रुपयांपर्यंत 10 टक्के दराने कर लागेल. 5,00,001 रुपयांपासून 8,00,000 पर्यंत 20 टक्के दराने कर लागेल आणि 8,00,001 रुपयांपासून पुढील रकमेवर 30 टक्के दराने कर लागेल.


टीप - जर आयकर दात्याला भांडवली नफा किंवा लॉँटरी इत्यादी, तत्सम उत्पन्न असेल तर त्यावर विशेष दराने आयकर लागेल.


आयकर देयता : वरीलप्रमाणे करपात्रता काढल्यानंतर त्यावर 3 टक्के एज्युकेशन सेस (2 टक्के एज्युकेशन सेस अधिक 1 टक्के सेकंडरी अ‍ॅड हायर एज्युकेशन सेस) काढावा. आता आलेल्या गोळाबेरजेतून अग्रिम कर, टी.डी.एस., टी.सी.एस. वजा करून घ्यावा. उरलेली देय कराची रक्कम जर 10,000 पेक्षा कमी असेल तर आयकर कलम 234 चा 1 टक्का प्रतिमाह प्रमाणे व्याज लागेल आणि उरलेली देय कराची रक्कम जर 10,000 पेक्षा अधिक असेल तर आयकर कलम 234 a, b आणि c प्रमाणे व्याज लागेल.


आयकर भरणे : मित्रांनो, आपण आयकर बॅँकेत जाऊन लाइनमध्ये लागून चालान भरू शकतो किंवा ऑनलाइनही पेमेंट करू शकतो, परंतु इंटरनेट बॅँकिंगने ऑनलाइन भरल्यामुळे आपला वेळ वाचतो. शारीरिक मेहनतही कमी होते आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण चलन हरवल्यानंतर ई-बॅकिंग चालू करून कितीही वेळेस प्रिंट घेऊ शकतो.


महत्त्वाची वजावटी : आयकर कायद्यात असलेल्या वजावटी योग्य प्रकारे घेतल्याने आपले कर आपण जास्तीत जास्त वाचवू शकतो. वजावटीबद्दल आपण माहिती घेऊ या.
1. कलम 80c : यात विमा हप्ता, अ‍ॅन्युटी, एम्लॉइज प्रॉव्हिडंट फंड, प्रॉव्हिडंट फंड, पोस्ट ऑफिस सेव्हिंग, एन. एस.एस.,एन. एस. सी., इ. एल.एस.एस.चे म्युच्युअल फंड, सुपरअ‍ॅन्युएशन फंड, पेंशन फंड, शेड्युल बॅँकेत 5 वर्षे किंवा अधिक कालावधीसाठी एफ. डी., ट्युशन फी, घर कर्जाच्या मुद्दलाची परत फेड. घर खरेदी करताना भरलेले मुद्रांक शुल्क, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांसाठी एफ.डी., इत्यादी गुंतवणुकीची वजावट मिळते.
2. कलम 80 d: यात मेडिकल इन्शुरन्स स्वत:च्या नावाने काढल्यास 15,000 रुपयांपर्यंत सूट मिळते आणि पालकाच्या नावाने वेगळे 15,000 रुपयांपर्यंत सूट मिळते. जर करदाता स्वत: किंवा पालक ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यासाठी 15,000 रुपयांऐवजी 20,000 रुपये सूट मिळेल. चालू वर्षापासून या कलमाअंतर्गत प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप केल्यास त्यासाठी 5000 रुपये सूट घेऊ शकतात.
3. कलम 80 ३३tta
: चालू वर्षात ही आणखी एक नवीन सूट करदात्यांना मिळेल. यात करदात्याला त्याच्या बचत खात्यावरील मिळालेल्या व्याजाची 10,000 रुपयांपर्यंत 100 टक्के वजावट मिळेल.
ई - फायलिंग : करदात्याने त्याचे पत्रक तयार करून ऑनलाइन रिटर्न सबमिट केल्यानंतर त्याची अ‍ॅक्नॉलेजमेंट प्रिंट करून त्याची एक प्रत सही करून त्यावर दिलेल्या बंगळुरूच्या पत्त्यावर 120 दिवसांच्या आत तिथे पोहोचेल याप्रमाणे स्पीड पोस्टाने पाठवावी. सदर पावती सी.पी.सी. सेंटरला मिळाल्यानंतर त्याबाबतचा ई-मेल रजिस्टर ई-मेल आय.डी.वर येतो. येथे आपली आयकर पत्रक भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते.