Home | Business | Gadget | sony-ericsson-xperia-active-is-truly-water-proof

सोनी एरिक्सनचा 'वॉटरप्रुफ' स्मार्टफोन बाजारात येणार

वृत्तसंस्था | Update - Jul 19, 2011, 12:31 PM IST

मोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी सोनी एरिक्सनने नुकतेच वेगळाच स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

  • sony-ericsson-xperia-active-is-truly-water-proof

    मोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी सोनी एरिक्सनने नुकतेच वेगळाच स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या नव्या हँडसेटचे नाव 'एक्सपीरिया एक्टिव' असे ठेवण्यात आले आहे.

    सोनीने हा दावा केला आहे की, हा हँडसेट वॉटरप्रुफ असल्याने पाण्यात पडला तरी त्याला काही होणार नाही. हँडसेट एँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित असल्याने जगातील हा पहिलाच वॉटरप्रुफ हँडसेट आहे. हँडसेट भिजलेल्या हातांनीही टच स्क्रिनद्वारे ऑपरेट करता येऊ शकतो. अशा प्रकारे ऑपरेट करता येणारा हा पहिलाच हँडसेट आहे.

    एक मीटर खोल पाण्यात ३० मिनिटे हा हँडसेट राहिला तरी याला कोणतेही नुकसान होणार नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. या हँडसेटमध्ये ५ मेगापिक्सल कॅमेरा आणि हाई डेफिनेशन रेकॉर्डिंगची सुविधा आहे. कंपनीकडून या हँडसेटची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
    follow us on twitter @ Divyamarathiweb

Trending