आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनीचा नवा स्‍मार्टफोन XPERIA ZR लॉंच, पाण्‍यातही काढा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅमसंगने दक्षिण कोरियात '5जी' तंत्रज्ञानाची यशस्‍वी चाचणी घेतली. त्‍यानंतर जापानची आघाडीची मोबाईल उत्‍पादक कंपनी सोनीने एक अप्रतिम स्‍मार्टफोन सादर केला आहे. सोनीने एक्‍स्‍पेरिया मालिकेचा विस्‍तार करताना एक्‍स्‍पेरिया झेडआर (Xperia ZR) या फोनबाबत जगभरात प्रचंड उत्‍सुकता होती. लॉंचिंगच्‍या आठवडाभरापूर्वीच स्‍पेसिफिकेशन्‍स लीक झाले होते.

या फोनचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे, पाण्‍यात फोटोग्राफी आणि फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डींगची क्षमता. हॅण्‍डसेट पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे. तब्‍बल अर्धा तास पाण्‍यात राहून काम करु शकतो. याशिवाय अनेक आ‍कर्षक फिचर्स या स्‍मार्टफोनमध्‍ये आहेत. सोनीकडून नव्‍या स्‍फार्टफोन्‍सची आक्रमक पद्धतीने मार्केटींग करण्‍यात येत आहे. कॅटरीना कैफला कंपनीने या हॅण्‍डसेटच्‍या जाहीरातीसाठी करारबद्ध केले आहे.