आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक कर्ज योजना : दक्षिण भारत आघाडीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पीक कर्जांचे प्रमाण दक्षिण भारतात सर्वाधिक, तर ईशान्येकडील राज्यांमध्ये सर्वात कमी आहे. सध्या असलेल्या विविध योजनांची शेतकर्‍यांना माहिती नसल्याने हे प्रमाण कमी-जास्त आहे. असोचेमच्या नुकत्यात आलेल्या एका अहवालानुसार सध्याच्या पीक कर्जाच्या बाबतीत शेतकर्‍यांना अगदी मोजकी माहिती आहे. त्यामुळे देशाच्या ईशान्येकडील आणि पश्चिमेकडील राज्यांत लघु आणि मध्यम शेतकर्‍यांबरोबरच बटाईदारही त्याला लाभ घेण्यास असमर्थ ठरत आहेत.

असोचेमने भारतात कृषी कर्जाविषयी नुकतेच एक सर्वेक्षण केले. त्याच्या अहवालानुसार कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधील बँकांमधून शेतकर्‍यांना इतर राज्यांच्या तुलनेत अधिक कर्ज देण्यात आले आहे. सरकार आणि बँकांच्या पुढाकारामुळे या भागातील शेतकर्‍यांमध्ये याबाबत अधिक जागरूकता आहे. गेल्या वेळची आकडेवारी पाहता या वर्षीही दक्षिण भारतातील शेतकरीच पीक कर्ज घेण्याच्या बाबतीत आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.

तसेच 2012-13 मध्ये उत्तर भारतातील शेतकर्‍यांना अधिक कर्ज मिळाले असण्याची शक्यता आहे. असोचेमच्या अहवालानुसार 2010-11 मध्ये दक्षिण भारतात कर्जप्रवाह 2008-09 च्या एक लाख 12 हजार 342 कोटी रुपयांच्या तुलनेत वाढून एक लाख 84 हजार 46 कोटी रुपये एवढा झाला आहे. त्याचप्रमाणे यादरम्यान उत्तर भारतातील शेतकर्‍यांना मिळालेले कर्ज 84,342 कोटी रुपयांवरून वाढून एक लाख 15 हजार 636 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 2010-11 मध्ये मात्र ईशान्येतील शेतकर्‍यांना 4,620 कोटी रुपयांचे पीक कर्ज देण्यात आले आहे.