आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार, बाईक किंवा सेलफोन हरवलाय तर काळजी करू नका !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कार, बाईक किंवा सेलफोन हरवलाय तर काळजी करू नका ! या सर्व गोष्टींच्या सुरक्षिततेसाठी सीपीपी असिस्टंस कंपनीने कोटक महिंद्र बँकेच्या सहकार्याने वन कॉल एसओएस ही एक अनोखी सेवा देशभर सुरु केली आहे.

एका वर्षाला ६९९ रुपये सेवा शुल्क भरून ही सेवा घेता येणार आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष इयान क्रेग यांनी दिली. ते म्हणाले की, सध्याच्या धावपळीच्या युगात सेलफोन, डेबिट कार्ड, बाईक, कार या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. त्या हरविल्या किंवा चोरीस गेल्या तर खोळंबा होतो. सीपीपीशी १८००-४१९-४००० या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करावी लागते. त्यानंतर कोटक बँकेशी १८००-१०२-६०२२ यावर संपर्क करावा लागतो. कार्ड ब्‍लॉक करणे, कार किंवा बाईक बंद पडल्यास इंधन भरून देणे, वाहन ओढून नेणे, पंक्चर काढून देणे अशा सेवा दिल्या जातात. पैशाचे पाकीट किंवा डेबिट कार्ड हरविले तर २० हजार रुपयांची विना व्याज उचल दिली जाते. पॅनकार्ड हरविले तर दुसरे मिळवून देण्यासाठी सहाय्य केले जाते.