आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोका न पत्कारणे हाच सर्वात मोठा धोका आहे -मार्क झुकरबर्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

14 मे 1984 ला अमेरिकेतील एका डॉक्टर दांपत्याच्या घरी मार्क झुकरबर्गचा जन्म झाला. गेल्या दहा वर्षात पैसा आणि प्रसिद्धी मिळवणारा तो एक मेहनती तरुण आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतीची बंधने मोडीत काडीत त्याने वयाच्या 20 वर्षी स्वत:चे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. कुतुहलाची गोष्ट म्हणजे माध्यमिक शाळेत असतानाच झुकरबर्गने प्रोग्राम डिझाइन करण्यास सुरवात केली होती. त्याचे घरच त्याची प्रयोगशाळा ठरली. झुकरबर्गचे वडिल डॉक्टर होते. त्यांनी त्याला पहिल्यांदा बोसिक प्रोगामिंगची माहिती दिली होती. 4 फेब्रुरवारी 2004 ला FACEBOOK अस्तित्वात आले.


17 व्या वर्षीच MICROSOFT आणि AOL कंपनीसमोर त्याने मांडला प्रस्ताव

उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मार्कने त्याच्या घराजवळच असणा-या मर्सी महाविद्यालयातून सॉफ्टवेअर विषयात डिग्री मिळवली. त्यानंतर त्याने कॅम्प्युटर प्रोगाम आणि अ‍ॅप्लीकेशन तयार करण्यास सुरवात केली. काही तरी नवे तयार करायचे या भावनेतून तो अशी एखादी भन्नात गोष्ट तयार करायचा, की सर्वजण अश्चर्यचकित होऊन पाहत राहायचे. याच काळात एडम डिशेंजलो या मित्रासोबत मिळून त्याने युजरचे आवडते गाणे स्टोअर करणारा सिनेप्स मिडिया प्लेअर तयार केला होता. MICROSOFT आणि AOL सारख्या दिग्गज कंपन्यानी यासाठी 20 लाखांची बोली लावली होती. या कंपन्यानी मार्कला नोकरीही देऊ केली होती. पण 17 व्या वर्षी नोकरीचा लोभ सोडून मार्क पुढील शिक्षणासाठी हावर्ड विद्यापिठात दाखल झाला.