आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्तात बुंग : स्पाइस जेटची तिकिटांवर 65 % सवलत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवे वर्ष विमान प्रवाशांसाठी सवलतींची भेट घेऊन येणार आहे. स्पाइस जेट या विमान वाहतूक कंपनीने नव्या वर्षात विमान प्रवासासाठी तिकिटांवर 65 टक्के सवलतीची योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार 19 जानेवारी ते 15 एप्रिल या काळात सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.
स्पाइस जेटने नव्या वर्षाची आकर्षक ऑफर म्हणून 65 टक्के सवलतीची योजना सुरू केली आहे. या योजनेत एक लाख सवलतींची तिकिटे देण्यात येणार आहेत. यासाठी येत्या पाच जानेवारीपर्यंत स्पाइस जेटच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन तिकिटांचे बुकिंग करावे लागणार आहे.
स्पाइसजेटच्या या योजनेतील किमान तिकीट दर 2,157 रुपये ठेवण्यात आला आहे. जानेवारी ते एप्रिल या काळात सुट्यांचा मोसम नसतो. नेमका हा काळ कॅश करण्यासाठी स्पाइस जेटने ही सवलतीची ऑफर आणली आहे. फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने विमान वाहतूक क्षेत्राचे
मंदीचे मानले जातात. त्यामुळे स्पाइस जेटने 19 जानेवारी ते 15 एप्रिल हा काळ या सवलतीच्या योजनेसाठी निवडला आहे.
आकर्षक योजना
दुसर्‍या एका योजनेनुसार स्पाइस जेटने तिकिटांवर 50 टक्के सवलत देऊ केली आहे. स्पाइस जेट कव्हर मॉडेल स्कीम नावाच्या या योजनेसाठी पाच जानेवारीपर्यंत ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे.