आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spice Jet Offer At India, Business News In Marathi

1999 रुपयांत विमान प्रवासाची संधी; स्पाइसजेटची स्वस्त ऑफर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्पाइसजेट कंपनीने पुन्हा एक स्वस्त विमान तिकीट दराची ऑफर मंगळवारी जाहीर केली. मान्सून सेल नावाच्या या ऑफरनुसार 1999 रुपयांत विमान प्रवासाची संधी मिळणार आहे. मंगळवारपासून तीन दिवस आरक्षण करता येणार्‍या या ऑफरनुसार दक्षिण भारतातील आठ निवडक शहरांतून हवाई सफर करता येणार आहे.

दक्षिण भारतातील बंगळुरू, चेन्नई, कोइम्बतूर, हैदराबाद, कोची, कोझीकोडे, म्हैसूर आणि विशाखापट्टणम या शहरांसाठी असणार्‍या या सवलत योजनेसाठी 11 जुलै ते 30 सप्टेंबर या काळात प्रवास करता येणार आहे. एअर एशियाच्या गुरुवारपासून सुरू होणार्‍या विमान सेवेला प्रत्युत्तर देण्यासाठी स्पाइसजेटने ही नवी ऑफर सादर केली आहे. एअरलाइन एअर एशियाची सहयोगी असणारी एअर एशिया कंपनीने कमी दरात विमान प्रवासाची ऑफर देऊन भारतीय विमान वाहतूक कंपन्यांसमोर आव्हान उभे केले आहे.

स्पाइसजेटचे सीसीओ कनेश्वरन एव्हिल यांनी सांगितले, पावसाळ्यात दक्षिण भारतात स्वस्त दरात विमान प्रवासाची योजना कंपनीने जाहीर केली आहे.

ऑफरचा धडाका
इंडिगो कंपनीने नुकतीच बंगळुरू, चेन्नई आणि गोवा मार्गावर एक रुपयात विमान प्रवासाची ऑफर जाहीर केली आहे. एअर एशियाने यापूर्वीच पाच रुपयांत (विमानतळ कर आणि इतर शुल्क वगळून) प्रवास या ऑफरअंतर्गत 15 हजार तिकिटांची विक्री केली आहे.