आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spice Jet Offer For Passengers, 1888 Rs Air Ticket

स्पाइसजेटची सणांनिमित्त १८८८ रुपयांत विमान प्रवासाची ऑफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीदिल्ली- वाजवी दरात विमानसेवा पुरवणाऱ्या स्पाइसजेट या विमान प्रवासी वाहतूक कंपनीने सणांनिमित्त खास ऑफर सादर केली आहे. देशातील सर्व विमान उड्डाणांसाठी लागू असलेल्या या ऑफरमुळे १८८८ रुपयांत विमान प्रवास करता येणार असल्याची माहिती स्पाइसजेटने दिली.

स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, देशातील विमान उड्डाणावर लागू असलेल्या या ऑफरसाठी २७ ऑगस्टपर्यंत बुकिंग करता येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर हे बुकिंग सुरू असून २५ सप्टेंबर २०१४ ते १५ जानेवारी २०१५ या काळात या सवलतीच्या तिकिटांवर प्रवास करता येईल. ग्रुप बुकिंग चालणार नसून या तिकिटांचे पैसे परत करण्यात येणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले.

सणांसाठी सवलत : देशातील सणांचा हंगाम लक्षात घेऊन स्पाइसजेटने ही ऑफर सादर केली आहे. यामुळे ग्राहकांचा अर्थात प्रवाशांचा आनंद द्विगुणीत होईल, अशी आशा असल्याचे सीसीओ कानेसवरन अव्हिली यांनी सांगितले.