Home | Business | Gadget | spice mobile launch new handset

‘स्पाइस’चा नवा हँडसेट ‘ट्रान्सफॉर्मर’ दाखल

बिझनेस ब्युरो | Update - Jun 30, 2011, 03:40 AM IST

बहुराष्ट्रीय कंपनी स्पाइस मोबिलिटीने देशातील पहिले क्लस्टर कार्यालय जयपूर येथे उघडले आहे.

  • spice mobile launch new handset

    जयपूर - बहुराष्ट्रीय कंपनी स्पाइस मोबिलिटीने देशातील पहिले क्लस्टर कार्यालय जयपूर येथे उघडले आहे. या वेळी कंपनीने ‘ट्रान्सफॉर्मर’ हा नवा हँडसेट बाजारात आणला. याची किमत ३७९९ रुपये आहे. कंपनीने गुजरात व राजस्थान राज्यांसाठी येथे क्लस्टर कार्यालय उघडले आहे.

    या कार्यालयात मोबाइलसंबंधीच्या सर्व तक्रारींचे निरसन केले जाणार आहे. कंपनीचे बिझनेसप्रमुख दिव्य गुप्ता यांनी सांगितले की, सध्या कंपनीचे १७ मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत. लवकरच आणखी आठ नवे मॉडेल बाजारात दाखल होणार आहेत. वाढती विक्री लक्षात घेऊन सर्व्हिस सेंटरची संख्याही वाढवण्यात येणार आहे. या वेळी डेल्टा मार्केटिंगचे दिलीप कालरा, कंपनीचे विभागीय व्यवस्थापक कपिल जैन आणि एरिया सेल्स मॅनेजर गाहुल निर्वाल उपस्थित होते.

Trending