आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Spicejet Airline Special Offer For Passengers, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता निम्म्या किमतीत करा विमान प्रवास, स्पाइसजेटची ऑफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्पाइसजेट या विमान वाहतूक कंपनीने आणखी एक सवलतीची ऑफर सादर केली आहे. या ऑफरनुसार मूळ किमतीच्या (बेस फेअर) ५० टक्के सवलतीत विमानप्रवास करता येणार आहे. यासाठी येत्या शनिवारपर्यंत (दि. २७) तिकिटांचे आरक्षण करावे लागणार असून पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत प्रवास करता येणार आहे.

स्पाइसजेटने सणांचा हंगाम कॅश करण्यासाठी गुरुवारी ही नवी ऑफर सादर केली असून ती दोन टप्प्यांतील प्रवासासाठी आहे. यानुसार २८ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत तसेच १५ जानेवारी ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत प्रवास करता येणार आहे. प्रवाशांनी गुरुवार ते शनिवारच्या मध्यरात्रीपर्यंत (दि.२७ सप्टेंबर) तिकीट आरक्षण केल्यास बेस फेअरमध्ये ५० टक्के सवलत मिळणार असल्याचे स्पाइसजेटने म्हटले आहे. स्पाइसजेटच्या देशांतर्गत सर्व उड्डाणांसाठी ही ऑफर असून आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी लागू नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
ऑफर्समुळे फायदा : स्पाइसजेटने दिलेल्या विविध ऑफर्समुळे कंपनीचा फायदा झाला असून प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे कंपनीचे सीसीओ कानेश्वरन अव्हिल यांनी सांगितले.

रेल्वेपेक्षा स्वस्त
स्पाइसजेटच्या या ऑफरचा विचार केल्यास रेल्वेच्या वातानुकूलित प्रवासापेक्षा विमानप्रवास स्वस्त झाला आहे. उदाहरणार्थ औरंगाबादहून दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे वातानुकूलित टू टायर प्रवासासाठी २२४५ रुपये लागतात. मात्र स्पाइसजेटच्या या ऑफरअंतर्गत याच प्रवासासाठी २०८७ रुपये लागतात.