नवी दिल्ली - स्पाइसजेटने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी कमी पैशात विमानप्रवासाची आकर्षक संधी आणली आहे. या ऑफरची सुरूवार 499 रुपयांनी करण्यात आली आहे. स्पाईसजेटने दिलेल्या या ऑफरची सुरूवात आजपासून (1 सप्टेंबर) असून ही 3 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या काळामध्ये तिकीट बुक करणारे प्रवासी 16 जानेवारी 2015 पासून ते 24 ऑक्टोबर 2015 पर्यंत प्रवास करू शकतील.
नुकतेच सार्वजनिक एअरलाईन्स असलेल्या एअर इंडियाने 27 ऑगस्टला एअर इंडिया दिवस साजरा केला होता. या दिवसाला अधिक खास बनवण्यासाठी एअर इंडियाने 27 ऑगस्टते 31 ऑगस्टपर्यंत 100 रुपये सामान्य दराप्रमाणे तिकीट विक्री केली होती.
या प्रकारचे ऑफर ऐकायला जेवढे आकर्षक वाटतात, मुळात ते तेवढे आकर्षक नसतात. या प्रकारचे ऑफर केवळ सामान्य दरांसाठी असतात. यामध्ये तिकिटांवर लावण्यात इतर करांचा समावेश नसतो. अशा वेळेस एका व्यक्तीच्या तिकिटासाठी जरी 100 रुपये खर्च करावे लागत असतील, मात्र मुळात त्याच्या खिशातून यापेक्षा अधिक पैसे खर्च होतात.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या... तुमच्या खिशातून किती रुपये जातील...
नोट - फोटोंचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.