आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SpiceJet Offers Domestic Flight Fares Starting 599 Rupees News In Marathi

रेल्वे भाड्यापेक्षाही स्वस्त दरात हवाईसफर; SpiceJetने दिली 599 रुपयांची ऑफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्पाइसजेट एअरलाइनने 'फेअरवॉर'मध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रवाशांना आकर्षित करण्‍यासाठी 'चीपर देन ट्रेन फेअर्स' नामक एक आकर्षक ऑफर लॉन्च केली आहे.

'चीपर देन ट्रेन फेअर्स'नुसार, प्रवाशांना 'स्पाइसजेट'ने आंतर्देशीय प्रवास फक्त 599 रुपयांत करता येणार आहे. या ऑफरमधील तिकिट रेल्वेच्या एकेरी प्रवास भाड्यापेक्षाही स्वस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ऑफर्सची तिकिटे कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन 11 ते 13 फेब्रुवारी असे तीन दिवस बुक करता येतील. तसेच या तिकिटांवर 1 जुलै ते 24 ऑक्टोबर या काळात प्रवाशांना प्रवासाचा आनंद घेता येईल.
'स्पाइसजेट'ने इंटरनॅशनल फ्लाइट्सवर देखील स्वस्त तिक‍िट ऑफर दिली आहे. प्रवाशांना डोमेस्टिक फ्लाइट्सने 599 रुपयांत तर इंटरनॅशनल फ्लाइट्सने 3499 रुपयांत हवाई प्रवास करता येईल.

दरम्यान, जानेवारी ते मार्च आणि जुलै ते सप्टेंबर हे सीजन एअरलाइन्ससाठी ऑफ सीजन मानले जाते. ऑफ सीजनमध्ये प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी देशातील एअरलाइन्स कंपन्यांनी ऑफर्स सुरू केल्या आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, स्पाइसजेटच्या 'चीपर देन ट्रेन फेअर्स'विषयी...