आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SpiceJet Super sale: Up To 75% Discount On Offer News In Amrathi

कंपन्यांची ऑफर; उन्हाळी सुट्यांत करा स्वस्तात विमान प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वाजवी दरात प्रवासी विमान सेवा देण्यासाठी प्रवाशांत लोकप्रिय असणार्‍या स्पाइसजेट या विमान वाहतूक कंपनीने सुट्यांचा हंगाम कॅश करण्यासाठी सोमवारी सुपर समर ऑफर जाहीर केली. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी स्पाइसजेटने तिकिटांवर 75 टक्के सूट जाहीर केली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना बुधवारपर्यंत तिकिटे आरक्षित करता येणार आहेत. त्यानंतर इंडिगो, गो एअर कंपन्यांनीही ऑपर जाहीर केल्या आहेत.

गेल्या एक महिन्यात कलानिधी मारन प्रवर्तक असणार्‍या स्पाइसजेटने तिसर्‍यांदा अशा स्वरूपाची तिकीट सवलत सादर केली आहे. या संदर्भात स्पाइसजेटने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सुपर समर ऑफरमध्ये मूळ प्रवासी तिकिटांच्या (बेस फेअर प्राइस) दरांसह इंधन अधिभाराच्या रकमेत 75 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. एक एप्रिल 2014 ते 30 जून 2014 या कालावधीत प्रवास करण्यासाठी ही ऑफर आहे. सुपर समर ऑफरअंतर्गत तिकिटांची नोंदणी करण्यासाठी बुधवारी मध्यरात्रीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

सुट्यांच्या गर्दीच्या आधीचा हंगाम विमान कंपन्यांसाठी खडतर असतो. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात बहुतेक विमानांतील आसने रिकामी असतात. हाच हंगाम कॅश करण्यासाठी स्पाइसजेटने जानेवारीत दोन ऑफर जाहीर केल्या होत्या. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच कंपनीने आता सुपर समर ऑफर जाहीर केली आहे, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया स्पाइस जेटचे सीओओ संजीव कपूर यांनी व्यक्त केली.

इंडिगो, गो एअरची ऑफर
स्पाइसजेटची ऑफर जाहीर झाल्यानंतर इंडिगो आणि गो एअर या विमान वाहतूक कंपन्यांनीही या स्पर्धेत उडी घेत प्रवाशांसाठी ऑफर जाहीर केल्या. गो एअर कंपनीने तिकिटांवर 70 टक्क्यांपर्यंत सवलत दिली आहे. यासाठी सोमवारपासून तीन दिवसांत तिकिटे बुक करता येणार आहेत, तर इंडिगो कंपनीने निवडक ठिकाणांसाठी सवलतीत तिकिटांची ऑफर जाहीर केली आहे.

सर्वांच्या हितासाठी
स्पाइसजेट यापूर्वीच्या सुपर सेल ऑफरला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सुपर समर सेल ही विशेष ऑफर जाहीर केली आहे. विमान वाहतूक कंपन्या आणि प्रवासी यांच्या भल्यासाठी या ऑफर आहेत. संजीव कपूर, सीओओ, स्पाइसजेट