आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spoiled Economical Health: Rupee Fall Fastly Compare To Dollar

बिघडते आर्थिक आरोग्य: डॉलरच्या वेगवान घोडदौडीने रुपयाची धूळधाण...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येत्या सहा महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपया 60.50 या नीचांकी पातळीवर पोहोचेल, असे मत स्टँडर्ड चार्टर्ड या जागतिक पातळीवरील वित्तीय सेवा कंपनीने व्यक्त केले आहे. यापूर्वी कंपनीने रुपया 53 या पातळीवर राहील, असा अंदाज व्यक्त केला होता.


अमेरिकेच्या चलनाची सातत्यपूर्ण घोडदौड, भारतीय बाजारातून विदेशी संस्था करत असलेला निधी उपसा आणि रुपयाची घसरण रोखण्यासाठीच्या कडक उपायांचा अभाव या कारणांमुळे स्टँडर्ड चार्टर्डने रुपयांविषयीचा आपला अंदाज बदलला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयांची होत असलेली घसरण थांबवण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णयांची गरज असल्याचे स्टँडर्ड चार्टर्डच्या पत्रकात म्हटले आहे.
रुपयांच्या घसरणीमुळे सकारात्मक आर्थिक कलाबाबतची जोखीम वाढली आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे विदेशी वित्तीय संस्थांकडून (एफआयआय) होणा-या गुंतवणुकीवर परिणाम होईल. भारतातील अस्थिर राजकीय परिस्थिती आणि सुधारणांबाबतचे लालफितीचे धोरण यामुळे जोखीम वाढत असल्याचे कंपनीने पत्रकात म्हटले आहे. गेल्या आठवड्यात 20 जून रोजी डॉलरच्या तुलनेत रुपयाने 60 ही सर्वकालीन नीचांकी पातळी गाठली होती.
रुपयाची परिस्थिती नाजूक
रुपयाची परिस्थिती नाजूक
*जगातील प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरमधील तेजी आणि देशातील शेअर बाजारातील घसरणीमुळे रुपयावर परिणाम झाल्याचे फॉरेक्समधील तज्ज्ञांनी सांगितले.
*अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने रोखे खरेदीत हात आखडता घेण्याचे संकेत मागील आठवड्यात दिले. तेव्हापासून सोने, चांदी या मौल्यवान धातूच्या किमतीत घसरण सुरू झाली.
*सरकारने व रिझर्व्ह बँकेने केलेल्या हस्तक्षेपामुळे शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने 30 पैशांच्या कमाईसह 59.27 पातळी गाठली होती.
*डॉलरला आलेल्या मोठ्या मागणीमुळे सोमवारी आंतरबँक विदेशी मुद्रा विनिमय बाजारात रुपयाने 40 पैसे गमावले आणि 59.67 पातळी गाठली.
डॉलरच्या मागणीचा फटका
डॉलरला आलेली मोठी मागणी आणि शेअर बाजारातील घसरणीने रुपयाचे बळ आणखी कमी केले. तेल आयातदारांकडून डॉलरला आलेल्या मागणीमुळे रुपयावर मोठा दबाब आहे.
परमित ब्रह्मभट्ट, सीईओ, अल्पारी फायनान्स