आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यातील गुंतवणुकीचे तेज गेले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ नवी दिल्ली - बांद्रा पश्चिमच्या हिल रोड भागात राहणारे विकास मदनानी गेल्या काही वर्षांपासून आपली बहुतांश गुंतवणूक सोन्यात करत होते. यादरम्यान त्यांनी 65 ते 200 टक्के परतावा कमावला, मात्र आता त्यांची सोन्यात गुंतवणूक करण्याची इच्छा नाही. त्याऐवजी त्यांचा शेअर्स व म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा मानस आहे. मदनानी यांचीच अशी स्थिती आहे असे नव्हे, तर एकूण गुंतवणूकदारांची ही मानसिकता आहे. आतापर्यंत सोन्यात गुंतवणूक करणार्‍यांच्या हाती निराशा आली आहे.

गेल्या पाच-सहा वर्षांत शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि फिक्स डिपॉझिटच्या तुलनेत सोन्याने चांगला परतावा दिला. केवळ 2012 आणि 2013 मध्ये सोन्याचे भाव थोडे कोसळले उर्वरित दिवसांत सोन्याच्या झळाळीचा गुंतवणूकदारांना फायदा झाला. सराफा तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मोदी अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्णय वेगात घेतील. अर्थव्यवस्थेने वेग धरल्यास शेअर बाजारही जोर धरेल. म्हणजेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड जास्त परतावा देतील.

सॉलिड असेट असल्याच्या कारणामुळे सोन्याच्या किमतीत खूप जास्त घट येत नाही. मात्र, दोन ते तीनपट परतावा मिळण्याची स्थिती अजिबात येणार नाही. रुपया 58 ते 59 रुपयांवर स्थिर राहिल्यामुळेही सोन्याच्या भाववाढीची शक्यता नाही.

मंदीमध्ये होती सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक
गेल्या पाच वर्षांत भारतीय रुपयाचे मूल्य खूप घसरले होते. भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत मंदी आली होती. अशात गुंतवणूकदारांनी सोने खरेदी करण्यावरच भर दिला, त्यामुळे सोन्याने चांगला परतावा दिला.

पॉलिसी पॅरालिसिस नष्ट होण्याची आशा
जगातील बहुसंख्य अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे संकेत आहेत. भारतात नवे सरकार आल्यामुळे ते अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्णय वेगात घेतील, अशी आशा आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेला पॉलिसी पॅरालिसिसचा काळ नष्ट झाला. यामुळे आर्थिक विकासदर दोन आकडी संख्येपर्यंत पोहोचेल. अशा स्थितीत येत्या चार ते पाच वर्षांपर्यंत इक्विटी आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक लाभदायक ठरेल.

28 ऑगस्ट 2013
सेन्सेक्स महिन्याच्या सर्वात खालच्या पातळीवर 17,448.71 अंकांवर थांबला. रुपया सर्वात कमकुवत होऊन 68.85 रुपयांवर आला होता. मात्र, सोन्याचा दर सर्वाधिक 35,074 रुपये प्रतितोळा (10 ग्रॅम) होते. विशेष म्हणजे ऑगस्टमध्ये लग्नसराई नसते वा मोठा सण.

5 जून 2014
सेन्सेक्स आपल्या सर्वोच्च 25,019 पातळीवर बंद झाला. रुपया बळकट होऊन 59.25 स्तरावर होता. या दिवसांत सोन्याचा भाव प्रतितोळा 25,913 रुपये झाला. या काळात लग्नसराई जोरात असते.

गेल्या 5 वर्षांत महागाईत 35% वाढ
गेल्या पाच वर्षांतील महागाईचा विचार करता परताव्याचे विश्लेषण केल्यास पाच वर्षांपूर्वी गुंतवलले 100 रुपये 135 झाले, तरी तुम्ही काहीच कमावले नाही. कारण या काळात महागाई 35 टक्क्यांनी वाढली. त्यामुळे परतावा शून्य राहिला.

.. आणि रुपया 25.30% घसरला
याच पद्धतीने रुपयातील घसरणीमुळे सोने परदेशी बाजारात स्वस्त झाले, मात्र आपल्या देशात त्याचे दर वाढले. गेल्या वर्षी जेव्हा सोने 25 हजार रुपयांपर्यंत घसरले, विदेशात या दराच्या तुलनेत ते 22 हजार रुपये असायला हवे होते.

पुढे वाचा, पाच वर्षात किती परतावा मिळाला?