आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता रेकॉर्ड करतानाच एडिट करा VIDEOS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्टफोनमध्ये फोटो काढणे आणि व्हिडीओ रेकॉर्ड करणे सर्वानाच आवडत असते. फोटो एडिट करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये अनेक अ‍ॅप असतात. मात्र व्हिडीओ एडिट करण्यासाठी कोणतेही टूल नसते. आता व्हिडीओ एडिट करण्यासाठी खास अ‍ॅप आले आहे. हे अ‍ॅप ios युजर्ससाठी उपलब्ध आहे.

या अ‍ॅपच्या मदतीने ios युजर्स व्हिडीओज टच इफेक्ट आणि फिल्टर सारख्या एडिटींग इफेक्टचा आनंद घेऊ शकता. या अ‍ॅपमध्ये तुम्ही व्हिडीओचा कुठलाही भाग एडिट करू शकता. याचबरोबर व्हिडीओ रेकॉर्ड करतानाच तुम्ही तो एडिटही करू शकता. हे अ‍ॅप तयार करणा-या नेटोमॅट कंपनीच्या मते अशा प्रकारचे हे पहिलेच अ‍ॅप आहे.


या अ‍ॅपमध्ये फ्रिज इफेक्ट, स्केच इफेक्ट, ओव्हर ले इफेक्ट, मॅगनीफाय इफेक्ट सारखे अनेक इफेक्ट आहेत. तुम्हाला व्हिडीओ एडिट करण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी हे एक चांगले अ‍ॅप आहे.

हे अ‍ॅप ios यूजर्ससाठी तयार करण्यात आले आहे. हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्राइड युजर्ससाठी कधी येणार आणि याच्यात आणखी काय फिचर्स असतील हे अद्याप कंपनीने जाहिर केलेले नाही.