आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Standar And Poor Rating Agency Red Singanling Indian Economy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खडतर मार्ग, स्टॅँडर्ड अ‍ॅँड पुअर पतमानांकन संस्थेचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मोठ्या प्रमाणावर तूट असलेल्या भारतासह अन्य अर्थव्यवस्थांना नजीकच्या काळात आणखी खडतर मार्गाने वाटचाल करावी लागणार असल्याचा सावध इशारा ‘स्टॅँडर्ड अ‍ॅँड पुअर’ या पतमानांकन संस्थेने दिला आहे.
तुटीचे प्रमाण लक्षणीय वाढलेले देश विशेषकरून भारत आणि इंडोनेशिया यांच्यासाठी नजीकचा काळ कठीण वाटचालीचा ठरणार आहे. परंतु आशियाई आर्थिक पेचप्रसंग पुन्हा उद्भवेल, असे आपणास वाटत नाही, असे मत ‘एस अ‍ॅँड पी’ने व्यक्त केले आहे.


चालू खात्यातील फुगलेली तूट आणि बचतीचे सर्वाधिक प्रमाण असल्यास अर्थव्यवस्थेचे गाडे सुरळीत असताना आंतरराष्‍ट्रीय बाजारातून कर्ज घेण्यासाठी फारशी अडचण येत नाही. परंतु बाजारातील जोखमीचे प्रमाण ज्या वेळी वाढते त्या वेळी चालू खात्यातील तुटीचा भार असलेल्या अर्थव्यवस्थांना विदेशातून वित्तीय पुरवठा मिळवताना मोठा ताण सहन करावा लागतो याकडेदेखील एस अ‍ॅँड पीने अहवालात लक्ष वेधले आहे.