आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Stanely Life Styles Start Their Brand Shop In Pune

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक ख्‍यातीच्‍या 'स्‍टेनले लाईफ स्‍टाईल्‍स'चे पुण्‍यात आगमन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अझीम प्रेमजीसारखे दिग्गज ग्राहक असलेल्या स्टेनले लाईफ स्टाईल्स कंपनीने औरंगाबादचे फर्निचर
व्यावसायिक सचिन पाटील यांच्या सहकार्याने पुण्यात लेदर अपहोल्स्त्री (चामडयाने मढवलेली आसने आणि आणि अन्‍य फर्निचर) स्टोअर सुरु केले आहे. याबरोबरच कंपनी २०१३ अखेरपर्यंत न्यूयॉर्क, पॅरिस, लंडन आणि दुबईत शाखा विस्तार करणार आहे.
याबाबत माहिती देताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सुरेश म्हणाले,"१९९६ मध्ये सुरु केलेल्या उद्योगाचे भांडवल ४ लाख रुपये आणि चारच कर्मचारी होते. आज १४० कोटी रुपये उलाढाल आणि ६०० कर्मचारी असलेला हा जागतिक ब्रँड आहे. बेंगळूरूजवळ याचा कारखाना असून २०१५ मध्ये चेन्नईत
दुसरा मोठा प्रकल्प सुरु केला जाणार आहे. त्यासाठी लेझीबॉय या अमेरिकेतील कंपनीशी करार करण्‍यात आला आहे. या प्रकल्पातून आशिया प्रशांत प्रदेशातील
देशात निर्यात केली जाईल. सध्या दिल्लीजवळ असलेल्या छोट्या कारखान्‍यातून आखाती देशात निर्यात केली जाते. देशात एकूण १३ शाखा असून युरोपातून लेदर आयात करून आम्ही फर्निचर बनवितो. पुण्यातील व्यावसायिक संधीची माहिती देताना सचिन पाटील म्हणाले, मुंबईतील एकूण उलाढालीच्या ३० टक्के व्यवसाय पुण्यातून होतो. येथील वाढत्या आयटी क्षेत्रामुळे स्टेनले उत्पादनांना चांगली मागणी येईल. १०००-२००० चौरस फुटाच्या सदनिका घेणारे आमचे ग्राहक आहेत. भविष्यात औरंगाबादसह मराठवाड्यातील मोठ्या शहरात व्यवसाय विस्ताराचा आमचा मानस आहे. स्टेनले ऑडी, बी एम डब्लू, फोक्सवागन अशा परदेशी बनावटीच्या कारसाठी लेदर अपहोल्स्त्री बनवून देते.