आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Starbucks Coffee Ceo Howard Schultz Arrange Forum

स्टार बक्सच्या कॉफीत सोशल फ्लेव्हरदेखील, अर्थव्यवस्थेत अस्थिरता, बिझनेस मॉडेलमध्ये बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉफी विकणारी बहुराष्ट्रीय कंपनी स्टार बक्सचे ६१ वर्षीय सीईओ हॉवर्ड शुल्झ यांना अश्रू ढाळणे, मिठी मारणे किंवा भावना व्यक्त करण्याचे वावडे नाही. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये वर्णद्वेषावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या एका बैठकीत उघडपणे आपली भूमिका मांडली. अलीकडेच अमेरिकेच्या फर्ग्युसन, न्यूयॉर्क आणि ओकलँड, कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या उपद्रव आणि पोलिस गोळीबारानंतर शुल्झ यांनी पाच शहरांमध्ये खुल्या व्यासपीठाच्या आयोजनाचा निर्णय घेतला. या फोरममध्ये स्टार बक्स यांच्या व्यवस्थापकापासून वेटरपर्यंत सर्व कामगारांनी वर्णद्वेषाबद्दल आपले अनुभव सांगितले. कंपनीत सुमारे ४० टक्के वेटर्स अल्पसंख्यक समूहाचे आहेत.
स्टार बक्स यांचे कर्मचारी त्यांचे कटू अनुभव सांगतात. काही रडतातही. पोलिसांच्या वागणुकीवर राग व्यक्त करतात. यावर शुल्झ म्हणतात, वॉशिंग्टन आणि शासनात नेतृत्वाचा अभाव आहे. त्यामुळे आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. शुल्झ अशा समस्यांवर कर्मचाऱ्यांशी बोलतात. इतर कंपन्यांचे सीईओ शक्यतो असे करत नाहीत. अलीकडच्या वर्षांत शुल्झ यांनी विद्यार्थी कर्ज, आरोग्य सेवा, ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, युवकांचा बेरोजगारी आणि हिंसाचाराच्या विषयावर पुढाकार घेतला आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या भविष्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
शुल्झ टाइमला सांगतात, देश योग्य दिशेने वाटचाल करत नाहीये. यावर शुल्झ यांच्या मित्रांसह कित्येकांची प्रतिक्रिया आहे की, शुल्झ राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढण्याचा विचार करत आहेत का? काही आठवड्यांपूर्वी वॉल स्ट्रीटच्या विश्लेषकांसमोर स्टार बक्सचे प्रभावशाली आकडे (१३% वाढ, विक्री ४.८ अब्ज डॉलर)जारी करत शुल्झ यांनी त्यांना वाईट वार्ताही ऐकवली. म्हणाले, आपल्यासारखी इतर कंपनी मानवी व्यवहार आणि अवस्थांवर इतक्या प्रमाणात अवलंबून नाही. दुर्दैवाने ही स्थिती चांगली नाही. शुल्झ यांचा रोख फर्ग्युसन दंगलीत संपूर्ण अमेरिकेत कॉफी विक्रीतील घसरणीकडे होता. न्यूयॉर्कमध्ये पोलिसविरोधी प्रदर्शनांत आणि २०१३ मध्ये सरकार ठप झाल्यावरही विक्रीवर परिणाम झाला होता.
शुल्झ यांना वाटते, अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कॉर्पोरेट बिझनेस मॉडेलमध्ये मोठ्या बदलाची गरज आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन स्टारबक्स यंदा अनेक लक्झरी रिझर्व्ह स्टोअर उघडणार आहे. त्यात ग्रहाकांना दुर्मिळ प्रकारच्या महागड्या कॉफीचे प्रकार मिळतील. काही स्टोअर मद्यविक्रीचा प्रयोग देखील करू शकतात. न्यूयॉर्क शहरात एक्सप्रेस स्टोअर आणि महाविद्यालय परिसरात मोबाइल ट्रकवर कॉफी विक्रीसारखे खास फॉरमॅट इतर ठिकाणी आजमावले जाऊ शकतात. भविष्यातील तयारी अमेरिकेच्या सिएटलस्थित स्टार बक्सच्या प्रकल्पात सीईओ हॉवर्ड शुल्झ.
शुल्झ राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवतील का?
अर्थव्यवस्थेचीस्थिती आणि वॉशिंग्टनमध्ये नेतृत्वाबद्दलची चर्चाच नसल्याने लोकांना वाटते की, शुल्झ स्वत:ला निवडणुकीसाठी तयार करत आहेत. ते डेमोक्रेट आहेत. अमेरिकेत श्रीमंत लोकांकडून राजकीय घोषणापत्र ठरवण्याची जुनी परंपरा आहे. शुल्झ यांचे जवळचे मनोरंजन सम्राट डेव्हीड गेफेन म्हणतात, मी हॉवर्डमधून २००८ मध्ये निवडणूक लढवायला सांगितली होती. आम्हा दोघांना वाटते, प्रशासनात खूप भ्रष्टाचार आहे. स्टार बक्समध्ये सल्लागार आणि शुल्झ यांचे मित्र बिल एकिन सांगतात, एकदा सीईओंनी राजकीय मैदानात उतरण्यावर गंभीर विचार केला होता. तिकडे शुल्झ म्हणतात, सध्या त्यांना निवडणूक आजमावण्यात स्वारस्य नाही.
गरिबीत गेले बालपण
अमेरिकेतकमी होणाऱ्या मध्यम वर्गाच्या हिशोबाने कंपनीला अापल्या बिझनेस मॉडेलमध्ये बदल करावा लागतील. शुल्झसाठी असे करणे अवघड नसेल. त्यांनी एका सामान्य कुटुंबात जन्म घेतला. त्यांचे वडील लष्करातून निवृत्त झाल्यावर ट्रक चालवायचे. एका दुर्घटनेत ते मानसिक, शारीरिक अपंग झाले. त्यावेळी हॉवर्ड शुल्ज लहान होते. कुटुंबाला केनारसी, ब्रुकलिनमध्ये दारिद्य्र कंठावे लागत होते. ते आता २.४अब्जडॉलरच्या संपत्तीचे मालक आहेत. ते कंपनीच्या वरिष्ठ अिधकाऱ्यांना सकाळी पाच वाजता ई-मेल पाठवून देतात. तज्ज्ञांच्याविरोधानंतरहीशुल्ज यंनी स्टाफला उदार बेनीफिट पॅकेज दिले. २००८मध्येबँकर्सना वाटत होते की, नफा कमावण्यासाठी अारोग्य सेवेवर खर्च कपात करावी. मात्र त्यांनी नकार दिला. शुल्ज म्हणाले, स्टार बक्सचे ७०टक्केकर्मचारी महाविद्यालयात शिकलेले नाहीत, असे आम्हाला आढळले. कंपनीने अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीसोबत ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे.१५०० कर्मचाऱ्यांनी त्यात भाग घेतला.
भविष्यातील योजना
-पुढील पाच वर्षांत वाजवी बजेट ग्राहकाला वळवण्यासाठी अनेक बदल.
-शिकागो, लॉस एंजलिस, सॅनफ्रांसिस्को, वॉशिंग्टन, न्यूयॉर्कसह इतर शहरांत १००हायएंड रिझर्व्ह स्टोअर उघडणार.
-प्रमुख महामार्गावर जुन्या कार्गो कंटेनरमध्ये आऊटलेट. मोबाइल पेमेंट सुरळीत करण्यासाठी.
-२०१५ अखेर काही शहरांत ग्राहकाला घरात कॉफी डिलेव्हर केली जाईल.
कल्याणकारी घोषणापत्र
- २०१८ पर्यंत दहा हजार जवान, निवृत्ती लष्करी अधिकाऱ्यांना नोकरी देण्याचे आश्वासन.
- शुल्झ फॅमिली फाउंडेशनने रिटेल आणि ग्राहक सेवांमध्ये नोकरीसाठी ७०० विकलांना प्रशिक्षण दिले आहे.
- कंपनीच्या कायम आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना पदवीधर करण्यासाठी शिकवणीची ऑफर.
- सर्व कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाइकांना आरोग्य सुविधा.