आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Starbucks News In Marathi, India, Coffee, Divya Marathi

भारतात मिळाले सर्वात वेगाने यश - स्टारबक्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कंपनीच्या इतिहासामध्ये सर्वात वेगाने विकास हा भारतात झाला असल्याचे जगभरात कॉफी स्टोरची चेन असणा-या स्टारबक्सने म्हटले आहे. गेल्या गेल्या 17 महिन्यांमध्ये स्टारबक्सने 40 स्टोअर सुरू केले आहेत.
अमेरिकेच्या या कॉफी चेनने भारतात टाटा ग्लोबल बेव्हरेजेसच्या भागीदारीमध्ये त्यांचे पहिले आऊटलेट ऑक्टोबर 2012 मध्ये सुरू केले होते. चार शहरांमध्ये सुमारे हजार जणांच्या भागीदारीत 40 स्टोर सुरू केल्याने
स्टारबक्सच्या इतिहासात भारतातील बाजारात सर्वाधिक वेगाने यश मिळाले अशल्याचे टाटा स्टारबक्सचे सीईओ अवानी दावदा यांनी सांगितले.


स्टारबक्सने सध्या मुंबई, दिल्ली, पुणे आणि बंगळुरूमध्ये स्टोर्स सुरू केले आहेत. कर्नाटकच्या कुर्गु परिसरात कॉफी प्लांटही सुरू केला आहे. स्टारबक्सचे जगभरातील 64 देशांत वीस हजार स्टोअर असून आठवड्याला ते सात कोटी ग्राहकांना सेवा देतात.