नवी दिल्ली - तुम्ही छोटे व्यापारी आहात आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून उद्योगाचा विस्तार करण्याची इच्छा असेल तर
गुगल तुमच्या मदतीला तयार आहे. अलीकडेच एका मासिकात आलेल्या वृत्तानुसार देशातील ३० लाख छोट्या व्यावसायिकांना ई-कॉमर्सच्या माध्यमातून जोडण्याची गुगलची योजना आहे. ही योजना प्रत्यक्षात आली तर गुगलच्या नेटवर्कमुळे छोट्या व्यावसायिकांच्या पदरात चांगला नफा पडू शकतो.
आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था मॅकेंजीच्या मते, चीनमध्येही अशाच स्वरुपाचा प्रयत्न सुरू आहे. तेथे छोट्या व्यापाऱ्यांना इंटरनेट व ई-कॉमर्सच्या माध्यमातून जोडून अर्थव्यवस्थेचा विकास दर तीन पट करण्याची तयारी सुरू आहे.
भारत सरकारही छोट्या व्यापाऱ्यांसाठी अनेक कार्यक्रम राबवत आहे. मात्र थेट लोकांशी संपर्क साधण्यासाठी गुगलची चांगली मदत होणार आहे. यासाठी गुगलने
आपले गुगल अॅप आणखी सुटसुटीत व सुलक्ष करण्यास सुरुवात केली आहे. तांत्रिक सुधारणेसह गुगलने आपल्या अॅपमध्ये अनेक नव्या सुविधा व फीचर्स जोडले आहेत. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना कमी खर्चात लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. याचा फायदा त्यांचा व्यवसाय विस्तारासाठी होणार आहे.