आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेट बँकेची गृह, वाहन कर्जे महागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सार्वजनिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्जदरात 0.20 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन व्याजदराची अंमलबजावणी गुरुवार, सात नोव्हेंबरपासून होणार असल्याने आता बँकेची गृह, वाहन आणि ग्राहक कर्जे महाग होणार आहेत. नजीकच्या काळात सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील अन्य बँकाही याच पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या आठवड्यात अल्प मुदतीच्या व्याजदरात पाव टक्क्याने वाढ करून तो 7.75 टक्क्यांवर नेल्यामुळे बँकांच्या निधी खर्चात वाढ झाली आहे. हा भार हलका करण्यासाठी. एचडीएफसी बँकेनेदेखील आपल्या व्याजदरात 0.20 टक्क्यांनी वाढ करून तो 10 टक्क्यांवर नेला आहे. एचडीएफसीच्या पाठोपाठ आता स्टेट बँकेनेदेखील व्याजदर वाढवले आहेत.

बँकेने आपल्या किमान कर्जदराची फेररचना करून तो सध्याच्या 9.80 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर नेला आहे. त्याच वेळी प्राधान्यकृत कर्जदरातदेखील 0.20 टक्क्यांनी वाढ करून तो 14.55 टक्क्यांवरून 14.75 टक्क्यांवर नेला आहे. स्टेट बँकेने गेल्याच महिन्यात आपल्या काही निवडक परिपक्वता कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.2 टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली आहे. त्यानुसार 180 ते 120 दिवस आणि एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवर अगोदरच्या 6.80 टक्क्यांच्या तुलनेत आता सात टक्के व्याजदर आकारण्यात आला आहे.