आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य बँकेच्या नफ्यात वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्य सहकारी बँकेने ३१ डिसेंबर २०१४ अखेर संपलेल्या तिस-या तिमाहीत चांगली कामगिरी बजावली आहे. बँकेचा नफा मागील वर्षीच्या तिस-या तिमाहीतील ७८ कोटींवरून ११६ कोटींवर पोहोचला आहे.
एप्रिल ते डिसेंबर या काळात बँकेचा एकूण निव्वळ नफा ३७१ कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षी ३१ डिसेंबर २०१३ अखेर बँकेचे नक्तमूल्य १०७४ कोटी होते. यंदा ते १७५३ कोटी झाले आहे. विशेष म्हणजे, पंचवार्षिक व्यावसायिक आराखड्यानुसार १४९८ कोटी नक्त मूल्याचे उद्दिष्ट होते. ते बँकेने मुदतीपूर्वीच साध्य केले आहे. बँकेने २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी सभासदांना १० टक्के लाभांश वितरित केला आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या ९ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत आर्थिक आढावा घेण्यात आला. साखरेच्या घसरणा-या किमतीबाबत व यामुळे बँकेने साखर उद्योगासाठी दिलेल्या कर्जाच्या आर्थिक ताणाबाबत बैठकीत चर्चा झाली.