आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Steel King Lakshmi Mittals Luxury Bungalow News In Marathi

जगभरातील 8 आलिशान बंगल्यांचे मालक आहेत स्टिल किंग लक्ष्मी मित्तल, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वांत श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी यांचा बंगला जगात सर्वांत आलिशान असला तरी स्टिल किंग लक्ष्मी मित्तल हेही आलिशान बंगल्यांचे शौकिन आहेत. त्यांच्याकडे एकापेक्षा एक सरस बंगले आहेत. लंडनपासून दिल्लीपर्यंत त्यांच्या मालकिचे कोट्यवधी रुपयांचे बंगले आहेत. यावरून त्यांच्या संपत्तीचा अंदाज लावला जाऊ शकतो.
ब्रिटनमध्ये किंग्सटन पॅलेस रो बिलेनियर रोच्या नावाने प्रसिद्ध आहे. यात लक्ष्मी मित्तल यांनी लग्झरी बंगला विकत घेतला आहे. त्यांनी 2004 मध्ये ग्रीन पॅलेस तब्बल 400 कोटी रुपयांना विकत घेतला. त्यापूर्वी तो फॉम्युला वन रेसचे बॉस बर्नी एक्लेस्टोन यांच्याकडे होता.
त्यावेळी तो जगातील सर्वांत महागडा बंगला होता. ताजमहाल बांधण्यासाठी ज्या खाणीतून दगड आणण्यात आले होते त्याच खाणीतून या बंगल्यात लावण्यात आलेले संगमवर आणण्यात आले आहेत. त्यामुळे याला ताज मित्तल असेही म्हटले जाते. यात 12 बेडरूम, एक इनडोअर पूल, टर्किश बाथ आणि 20 कार राहू शकतील एवढी पार्किंग स्पेस आहे.
2008 मध्ये त्यांनी किंग्सटन पॅलेस रोमध्ये सहा क्रमांकाचा बंगला विकत घेतला. त्याची किंमत तब्बल 800 कोटी रुपये होती. त्यावेळी ती सर्वांत महागडी प्रॉपर्टी होती. या चार मजली या बंगल्यात पाच लग्जरी बेडरुम आहेत. या बंगल्याची उभारणी 1900 मध्ये पोर्टलॅंडच्या महागड्या दगडांपासून आणि विटांपासून करण्यात आली आहे. मित्तल यांनी त्यांचा मुलगा आदित्य यासाठी हा बंगला विकत घेतला आहे.
त्यानंतर काही दिवसांनीच किंग्सटन पॅलेस रोमध्ये त्यांनी मुलीसाठी एक बंगला विकत घेतला. त्यांची मुलगी वनिशा हिला त्यांनी हा बंगला गिफ्ट दिला. याची किंमत सुमारे 500 कोटी रुपये आहे. यापूर्वी पॅलेस्टाईनच्या दुतावासाच्या रुपात या बंगलाचा उपयोग करण्यात येत होता.
लक्ष्मी मित्तल यांचे स्कॉटलॅंड, इंडोनेशिया, त्रिनिनाद आदी ठिकाणी आलिशान बंगले आहेत.
पुढील स्लाईडवर बघा लक्ष्मी मित्तल यांचे आलिशान बंगले...