आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stock Market Bulls Hopeful But Not Ready To Charge Yet

साप्ताहिक आढावा : सेन्सेक्स, निफ्टीचा 3 आठवड्यांचा नीचांक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तब्बल नऊ महिन्यांनंतर झालेल्या व्याजदर कपातीमुळे थोडाफार दिलासा मिळतो ना मिळतो तोच मध्यवर्ती बँकेने चालू आणि वित्तीय आशा दोन्ही तुटींच्या भारामुळे चालू आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धी कमी प्रमाणात होण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे बाजाराचा मूड गेला. त्याचा परिणाम म्हणून सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक साप्ताहिक आधारावर तीन आठवड्यांच्या खालच्या पातळीवर बंद झाले. चौथ्या तिमाहीत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत झालेल्या घसरणीचादेखील विपरीत परिणाम बाजारावर झाला.

रिझर्व्ह बँकेने मंगळवारी अल्प मुदतीच्या व्याजदरात आणि रोख राखीव प्रमाणात प्रत्येकी पाव टक्क्याने कपात करण्याची घोषणा केली. रोख राखीव प्रमाण कमी झाल्यामुळे आर्थिक यंत्रणेत 18 हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवल आले. व्याजदर कमी होताच बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होऊन सेन्सेक्स प्रारंभी 20,203.66 अंकांच्या गेल्या दोन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर गेला, परंतु वाढती वित्तीय तूट आणि व्यापार तुटीमुळे चालू आर्थिक वर्षात विकास दर 5.5 टक्क्यांपर्यंतच मजल मारू शकेल, असा सावध अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त करताच बाजाराचा मूड बदलला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर झालेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्सची घसरण सुरू झाली ती शेवटपर्यंत. साप्ताहिक आधारावर सेन्सेक्स 20 हजार अंकांच्या खाली जाऊन 19,781.19 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

टॉप लुझर्स : भारती एअरटेल, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक, जिंदाल स्टील, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, टाटा पॉवर, गेल, हिंदाल्को, ओएनजेसी, हिंदुस्तान युनिलिव्हर
टॉप गेनर्स : कोल इंडिया, सिप्ला, आयटीसी, हीरो मोटोकॉर्प