आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stock Markets May See Volatile Sessions This Week

अमेरिकेच्या आशेवर तेजीला बळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अमेरिकेची अर्थव्यवस्था लवकरच पुन्हा रुळावर येण्याच्या नव्या आशा पल्लवित झाल्यामुळे सकाळच्या सत्रातील नरमाईचे वातावरण झटकले जाऊन जोरदार खरेदी झाली. विशेष करून इन्फोसिस आणि टीसीएसच्या समभागांच्या झालेल्या खरेदीमुळे सुरुवातीचा तोटा भरून काढत सेन्सेक्सने 161 अंकांची उसळी मारत 19,413.54 अंकांच्या दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला.

वास्तविक पाहता सेन्सेक्स सकाळच्या सत्रात काहीशा खालच्या पातळीवर उघडला, परंतु नंतर झालेल्या खरेदीच्या झंझावातात तो 160.93 अंकांनी वाढून 19,413.54 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या तीन दिवसांपासून बाजारात सतत सुरू असलेल्या खरेदीमुळे सेन्सेक्सने 536 अंकांची दणदणीत वाढ नोंदवली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील सुरुवातीला 5810.30 अंकांच्या पातळीवर उघडला, परंतु दिवसअखेर 44.70 अंकांनी वाढून 5863.30 अंकांच्या चांगल्या पातळीवर बंद झाला.

व्याजदर संवेदनशील समभागांची मागणी कायम : या महिन्यात जाहीर होणार्‍या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करण्याची अपेक्षा चांगलीच वाढली आहे. त्यामुळे व्याजदर संवेदनशील समभागांची सातत्याने खरेदी सुरू आहे.