आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • STOCKS CLOSE: BSE Sensex Touches 21000 As FIIs Remain

सेन्सेक्स 21 हजारांवरून परत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - फेब्रुवारीतील वायदापूर्ती सौद्यांच्या शेवटच्या सत्रात जोरदार खरेदी झाल्याने सेन्सेक्स वधारला. माहिती तंत्रज्ञान, एफएमसीजी समभागांची चांगली खरेदी झाल्याने बाजारात सलग चौथ्या सत्रात तेजी दिसून आली. जागतिक पातळीवर संमिर्श कल दिसून आला. इंट्रा डे व्यवहारात सेन्सेक्सने 21 हजारांच्या पातळीला स्पर्श केला. सत्राअखेरीस सेन्सेक्स 134.52 अंकांनी वाढून 20,986.99 वर बंद झाला. निफ्टीने 38.75 अंकांच्या कमाईसह 6238.80 ही पातळी गाठली.

बुधवारी बाजारात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी दिसून आली. विप्रोने 1.38 टक्के वाढीसह 52 आठवड्यांचा उच्चांक नोंदवला. इन्फोसिस 0.56 टक्के वधारला. ब्रोकर्सनी सांगितले, वायदा सौद्यांची बुधवारी अखेरची मुदत होती, त्यामुळे बाजारात मोठी खेरदी-विक्री दिसून आली.