आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्स घसरला, पावसाने मारलेल्या दडीने बाजाराची चिंता वाढवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अबकारी शुल्कातील कपात कायम राहिल्याने शेवटच्या सत्रात वाहन कंपन्यांच्या समभागांची चांगली खरेदी होऊनदेखील त्याचा फायदा होऊ शकला नाही. मान्सूनने मारलेली दडी, इराकमधील चिघळलेल्या पेचप्रसंगामुळे जागतिक शेअर बाजारात आलेली मरगळ आणि जूनमधील डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची संपत असलेली मुदत लक्षात घेऊन बाजारात झालेल्या विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स एक आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून खाली येत 55 अंकांनी घसरला.

इराकमधील पेचप्रसंगाबरोबरच पावसाने मारलेल्या दडीने बाजाराची चिंता वाढवली आहे. याचा परिणाम अन्नधान्याच्या किमतीवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी बाजारापासून दूर राहण्याचे पसंत केले आहे. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या, भांडवली वस्तू, बॅँक समभागांना चांगली मागणी आली. वाहन, औषध, स्थावर मालमत्ता आणि ग्राहकोपयोगी समभागांवर विक्रीचा ताण आला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक चांगल्या पातळीवर उघडला. प्रारंभी तर सेन्सेक्स 25,427.80 अंकांच्या कमाल पातळीवर गेला होता, परंतु दिवसअखेर त्यात 55.16 अंकांची घसरण होऊन तो 25,313.74 अंकांच्या पातळीवर बंद झाला.