आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stop Unnecessary Mobile Service On 155223 Number

155223 या क्रमांकावरून बंद करा अनावश्यक मोबाईल सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/पठाणकोट - तुमच्या मोबाइलवर चुकून कॉलर टोन, क्रिकेट अपडेट, भविष्य किंवा अन्य कोणती व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिस अ‍ॅक्टिव्हेट झाली असेल तर त्याचा त्रास वाटून घेऊ नका. केवळ एका दूरध्वनीद्वारे यातून सुटका होऊ शकेल. ट्रायने (टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया) यासाठी टोल फ्री क्रमांक 155223 जारी केला आहे.
या क्रमांकावर तक्रार केल्यानंतर 24 तासांत ही सेवा बंद होऊ शकेल. याव्यतिरिक्त मोबाइल कंपन्यांकडून येणारे नव्या योजनांबाबतचे एसएमएस व कॉल बंद करण्यासाठी ग्राहकांना केवळ मेसेज बॉक्समध्ये स्टार्ट 0 टाइप करून 1909 वर पाठवायचा आहे. कोणत्याही कंपनीचा ग्राहक हा क्रमांक डायल करून व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिस बंद करू शकतो. याव्यतिरिक्त ट्रायच्या सर्व मोबाइल कंपन्यांना रात्री 9 ते सकाळी 9.00 वाजेपर्यंत कोणता संदेश किंवा कॉल करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याचे पालन न झाल्यास ग्राहक डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट एनसीसीपीटीआरएआय डॉट जीओव्ही डॉट इनवर तक्रार करू शकतात.