आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stope Strike Otherwise Palusar Producation In Aurangabad

...अन्यथा ‘पल्सर’चे उत्पादन औरंगाबादला, पुण्यातील संपकरी कामगारांना ‘बजाज’ची तंबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - येत्या दहा दिवसांत काम बंद आंदोलन मागे घ्या, अन्यथा पल्सर दुचाकीचे उत्पादन औरंगाबादच्या प्रकल्पातून केले जाईल, अशी सज्जड तंबी बजाज ऑटो व्यवस्थापनाने चाकण प्रकल्पातील आंदोलक कामगारांना सोमवारी दिली.
बजाज व्यवस्थापन व कामगारांत आठवडाभरापासून संघर्ष सुरू आहे. बडतर्फी, चौकशीची कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी कामगारांनी 25 जूनपासून ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. यामुळे पल्सर, डिस्कव्हर गाड्यांचे उत्पादन ठप्प आहे. बजाज व्यवस्थापनाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन कामगारांना तंबी देण्याचा प्रयत्न केला. ‘बजाज ऑटो’चे मुख्य कार्यवाहक अधिकारी प्रदीप श्रीवास्तव, उपाध्यक्ष कैलास झांजरी, मनुष्यबळ विभागाचे उपाध्यक्ष अमृत रथ यांनी भूमिका मांडली.


कामगार कामावर परतण्याची दहा दिवस वाट पाहू. अन्यथा पल्सरचे उत्पादन औरंगाबादला हलवले जाईल, असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. प्रकल्पातील 900 कायम कामगार विश्व कल्याण कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आहेत. कामात कुचराई, कारखान्याच्या आवारात हुल्लडबाजी या कारणांमुळे 42 कामगारांना निलंबित करण्यात आले होते. 12 जणांची चौकशी सुरू आहे. इतर कामगारांना मारहाण केल्यावरून 13 जणांवर पोलिसांत तक्रार आहे. या कामगारांवरील कारवाई मागे घेतली जाणार नसल्याचे झांजरी यांनी सांगितले.