आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टोअर्ड व्हॅल्यू कार्ड बनले सोन्याची खाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी न्यूयॉर्क शहराच्या सब-वे सिस्टिमने प्रवास करताना मेट्रो कार्डने भाडे देतो. मोबाइल फोनवर स्टारबक्स एपच्या माध्यमातून कॉफी विकत घेतो. टाइमच्या कॅफेटेरियामध्ये कॉर्पोरेट कार्ड स्वॅप करून जेवणाचे बिल देतो. कारने जाताना ईझेड पासच्या मार्फत पथकर भरतो. या सगळ्या व्यवहारात एकसमानता आहे. स्टोअर्ड व्हॅल्यू कार्डचा वापर. ते न्यूयॉर्क मेट्रोपॉलिटन ट्रान्झिट अथॉरिटीचे (एमटीए) मेगास्ट्रीप प्लास्टिक कार्ड असो, आयफोनचा बारकोड असो अथवा ईझेड पासचे ट्रान्सपोंडर असो. मला नियमितपणे प्रत्येक डिव्हाइससाठी क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्यातून रक्कम भरावी लागते. वेगवेगळ्या स्टोअर्ड व्हॅल्यू कार्डवर प्रत्येक वेळी सुमारे 14125 रुपये ठेवावे लागतात.


स्टोअर्ड व्हॅल्यू कार्ड जवळपास दहा वर्षांपासून चालत आहेत. सोयीस्कर असल्याने कोणत्याही ब्रँडशी निष्ठा आणि पर्यायाअभावी या कार्डांची मागणी वाढत आहे. मर्केटर सल्लागार मंडळानुसार गेल्या वर्षी अमेरिकन लोकांनी स्टोअर्ड व्हॅल्यू कार्डच्या माध्यमातून 27290 अब्ज रुपये खर्च केले. यात अमेरिकन एक्स्प्रेससारखे ओपन लूप कार्डचे 10394 अब्ज रुपये आणि न्यूयॉर्क मेट्रो कार्डसारखे क्लोझ्ड लूप कार्डच्या 16892 रुपयांचा समावेश आहे.


ट्रान्झिट पास आणि कॉफी कार्ड विकणा-या संस्थानांसाठी ही स्थिती वरदानासारखी आहे. एमटीएकडे गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत मेट्रो कार्डच्या रूपात 1299 कोटींचे भांडवल होते. त्याला यंदा एक्सपायर्ड, हरवलेल्या किंवा वापर न केलेल्या कार्डांचे 293 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. अमेरिकेत स्टोअर्ड व्हॅल्यू कार्डमध्ये इतकी प्रचंड संपत्ती लावलेली आहे की, मुदत संपणे, शुल्क आणि बेवारस संपत्तीवर राज्यांच्या अधिकाराच्या मुद्यावर वेगवेगळ्या राज्यांमध्ये कायदेशीर वाद सुरू आहेत.


या कार्डांमुळे लोकांचे बदललेले व्यवहार आणि पद्धतींमुळे फेडरल रिझर्व्ह बाजाराच्या दिशेच्या विश्लेषणासाठी अभ्यास करत आहे. यावर स्टारबक्सकडून उत्तर मागवले जाऊ शकते. गेल्या वर्षी स्टार बक्सच्या अमेरिकन ग्राहकांनी कंपनीचे 169 अब्ज रुपये किमतीचे कार्ड आणि एप्स डाउनलोड केले. नवीन कार्ड गेल्या वर्षीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी वाढले आहेत. कार्ड आणि एपसोबत सोयीही आहेत. ट्रान्झॅक्शन लवकर होते. 12 कप कॉफी खरेदीनंतर एक कप कॉफी मोफत मिळते. गणिताच्या हिशेबातून पाहिल्यास अ‍ॅडव्हान्स पैसे आणि खरेदीच्या सवयीची माहिती देऊन 7.7 सूट मिळवली जाऊ शकते.